‘सरपंच अ‍ॅवॉर्ड’साठी गावे सरसावली, ‘लोकमत’च्या योजनेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 2:21am

गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ या योजनेला जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ या योजनेला जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा पहिलाच पुरस्कार सोहळा आहे. सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन तसेच कृषी, आरोग्य आदी बारा क्षेत्रांत केलेल्या कामाची नोंद घेऊन या प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणाºया सरपंचांना जिल्हा पातळीवर ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड-२०१७’ दिला जाणार आहे. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक आहेत. या बारा पुरस्कारांसह सर्वांगीण काम असणाºया सरपंचास ‘सरपंच आॅफ द इयर’ हा अ‍ॅवॉर्डही दिला जाणार आहे. याच सरपंचांचे पुढे राज्यपातळीवरील अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन होणार आहे. त्यातून या विभागांतील राज्यस्तरावरचे पुरस्कारार्थी निवडले जातील. आदर्श सरपंचांचा शोध घेत त्यांच्या धडपडीची दखल घेण्यासाठी व इतरांना प्रेरणा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरपंच स्वत: या पुरस्कारांसाठी आपले नामांकन दाखल करू शकतात. याशिवाय जनताही त्यांना आदर्श वाटणाºया सरपंचांचे नामांकन दाखल करु शकते. ‘लोकमत’चे ज्युरी मंडळ या नामांकनाची छाननी करुन पुरस्कारार्थींची निवड करणार आहे. चला सहभागी होऊ या १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ आॅक्टोबर २०१७ या काळात सरपंचपदावर कार्यरत असलेले आजी, माजी व नवनियुक्त सरपंच या पुरस्कार योजनेत आपले नामांकन दाखल करू शकतील. नामांकनासाठीच्या प्रवेशिका ‘लोकमत’च्या जिल्हा व विभागीय कार्यालयांत उपलब्ध आहेत.www.lokmatsarpanchawards.in  या संकेतस्थळावर सरपंच तसेच नागरिकही पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करू शकतात. अधिक माहितीसाठी ९९२३३७८४७६, ९९२०१७९२८२ या क्रमांकांवर संपर्क करावा. पुरस्कारांसाठीचे जिल्हे अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा औरंगाबाद लातूर रायगड अहमदनगर धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर पुरस्कारांची वर्गवारी आणि निकष 1 जलव्यवस्थापन : गावाला पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केलेली व्यवस्था, जलसंधारण, पाणी बचत, पाणीपट्टी वसुली पद्धत, सांडपाणी व्यवस्थापन. 2वीज व्यवस्थापन : गावातील दिवाबत्तीच्या सोयी, वीज बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, वीज निर्मितीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग. 3शैक्षणिक सुविधा : गावातील शैक्षणिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीचे प्रयोग. 4स्वच्छता : प्रथमदर्शनी दिसणारे गावाचे रुप, कचरा संकलन पद्धत, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:स्सारण, हागणदारीमुक्ती 5आरोग्य : आरोग्याच्या सुविधा, कुपोषणाचे प्रमाण, आरोग्यदायी गावासाठीचे प्रयोग, लसीकरण, साथरोगांबाबतचे व्यवस्थापन. 6पायाभूत सेवा : रस्ते, वीज, पाणी, कम्युनिकेशन, दळणवळण, वाचनालय, मनोरंजन केंद्र, मार्केट या सुविधांची निर्मिती, वीज व पाणी बिल भरण्याची सोय 7ग्रामरक्षण : तंटामुक्ती, अवैध धंद्यांना बंदी, महिला-युवती-बाल सुरक्षेविषयी केलेले प्रयोग, ग्रामरक्षक दलाची स्थापना 8पर्यावरण संवर्धन : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जल व वायूप्रदूषण, कुºहाडबंदी, चराईबंदी, प्लॅस्टिकबंदी, गौण खनिजाचे रक्षण ( उदा. वाळूउपसाबंदी) 9प्रशासन/ ई-प्रशासन / लोकसहभाग : ई-पंचायत व पंचायतकडून दिल्या जात असणाºया आॅनलाईन सेवा, गावकºयांकडून होत असलेला आॅनलाईन सेवांचा वापर, ग्रामसभा व इतर विकास कामांतील लोकसहभाग, कर संकलन, योजनांची अंमलबजावणी, निधी खर्चाचे प्रमाण, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत 10रोजगार निर्मिती : ग्रामपातळीवर रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न, बचत गटांच्या माध्यमातून उभारलेले प्रकल्प, शेतकरी कंपन्या, सामूहिक शेती 11उदयोन्मुख नेतृत्व : कुठलीही पार्श्वभूमी नसताना गावाच्या विकासात नावीन्यपूर्ण सहभाग देत असलेला तरुण सरपंच. 12कृषी तंत्रज्ञान : शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर,सेंद्रीय शेती 13सरपंच आॅफ द इयर : विविध क्षेत्रात सर्वांगीण योगदान देणाºया सरपंचास ‘सरपंच आॅफ द इयर’ अवॉर्डने गौरविले जाईल.

संबंधित

‘प्रेरणास्थळ’ येथे आज संगीतमय प्रार्थना सभा
रसिक श्रोत्यांचा जनसागर :
चंद्रपुरातील रस्ते लवकरच घेणार मोकळा श्वास
भाजपाची ऐनवेळी बोरेलेंना हुलकावणी
पोलिसांच्या लेखी काजलची आत्महत्याच

पुणे कडून आणखी

‘हेरिटेज टुरिझम’ला चालना मिळावी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज
कर्जमाफी लाभार्थ्यांची दुसरी यादी
तुमच्या पाठबळामुळेच पक्षाला बळ, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा
पोटगी टाळण्यासाठी पतीने दाखल केला खोटा पुरावा, पत्नीला दरमहा ५ हजार रुपये देण्याचे आदेश
डाळिंब बागायतदारांची दलालांकडून लुबाडणूक, बारामती, इंदापूरच्या शेतक-यांना फटका

आणखी वाचा