पुणे विद्यापीठ : १६ जागांसाठी ६१ मतदान केंद्रे; तयारी अंतिम टप्प्यात; अधिसभेसाठी रविवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:25 AM2017-11-18T06:25:37+5:302017-11-18T06:25:51+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पदवीधर प्रतिनिधीसाठी पुणे, नगर, नाशिक व दादरा-नगर हवेली येथील ५८ केंद्रांवर, तर व्यवस्थापन प्रतिनिधी पुणे, नगर व नाशिक येथील ३ केंद्रांवर मतदान होणार आहे.

 University of Pune: 61 polling stations for 16 seats; Final phase of preparation; Polling for the Upper House on Sunday | पुणे विद्यापीठ : १६ जागांसाठी ६१ मतदान केंद्रे; तयारी अंतिम टप्प्यात; अधिसभेसाठी रविवारी मतदान

पुणे विद्यापीठ : १६ जागांसाठी ६१ मतदान केंद्रे; तयारी अंतिम टप्प्यात; अधिसभेसाठी रविवारी मतदान

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पदवीधर प्रतिनिधीसाठी पुणे, नगर, नाशिक व दादरा-नगर हवेली येथील ५८ केंद्रांवर, तर व्यवस्थापन प्रतिनिधी पुणे, नगर व नाशिक येथील ३ केंद्रांवर मतदान होणार आहे. येत्या रविवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरच्या १० जागांसाठी, तर व्यवस्थापन प्रतिनिधीपदाच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. नोंदणीकृत पदवीधरच्या खुल्या गटातील ५ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी ६ उमेदवार, अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, डीटी/एनटी प्रवर्गाच्या एका जागेसाठी ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. व्यवस्थापन प्रतिनिधींच्या खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रवर्गाची जागा बिनविरोध निवडली गेली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकाच उमेदवाराचा अर्ज आला होता, मात्र
तो अवैध ठरल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. नोंदणीकृत पदवीधरचे ४९ हजार ७६१ मतदार आहेत, तर व्यवस्थापन प्रतिनिधीसाठी २२८ मतदार आहेत. निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली. केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पसंतिक्रम नोंदवून करावे मतदान
व्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधर सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी पसंतिक्रम नोंदवून मतदान करायचे आहे. हा पसंतिक्रमांक नोंदविताना तो इंग्रजी किंवा मराठी आकड्यामध्येच (अक्षरी नव्हे) नोंदविणे, पसंतिक्रमांक देण्यास १ आकड्यापासून सुरुवात करणे, केंद्रात दिलेल्या ब्लू पेनचाच वापर करणे, उमेदवाराच्या समोर ठळक दिसेल असा पसंतिक्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. यामध्ये काही चूक झाल्यास मत बाद ठरविले जाईल़
प्रशासनाकडून मतदारांना ई-मेल
व मेसेजद्वारे केंद्रांची माहिती
४अधिसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधरासाठी नोंदणी केलेल्या मतदारांना विद्यापीठ प्रशासनाकडून ई-मेल व मेसेज पाठवून त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या निवडणूक पोर्टलवर मतदान केंद्र व मतदार क्रमांक शोधण्यासाठी आॅनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून दिली.
काही महाविद्यालयांमध्ये गैरप्रकार होण्याच्या तक्रारी-
महाविद्यालयांतील मतदान केंद्रांमध्ये त्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक हे मतदार केंद्राध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे काही महाविद्यालयांमध्ये बोगस मतदान होण्याची लेखी तक्रार काही उमेदवारांनी केली होती. शिवाजीनगरचे मॉडर्न कला व वाणिज्य महाविद्यालय, निगडीचे मॉडर्न कॉलेज आॅफ फार्मसी, बाबूराव घोलप महाविद्यालय, सांगवी आदी महाविद्यालयांमध्ये निवडणुकीच्या दरम्यान गैरप्रकार होण्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. त्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाचा पूर्णवेळ निरीक्षक उपलब्ध
राहणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी सांगितले.

Web Title:  University of Pune: 61 polling stations for 16 seats; Final phase of preparation; Polling for the Upper House on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.