बारामती येथे मॉल मध्ये खेळताना पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 12:00 PM2019-06-10T12:00:27+5:302019-06-10T12:07:23+5:30

मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिल मुळे पार्थ याचा मृत्यू झाला आहे..

Unfortunatly death of a child due to falling in mall at Baramati | बारामती येथे मॉल मध्ये खेळताना पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

बारामती येथे मॉल मध्ये खेळताना पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देसुभद्रा मॉलमध्ये सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे लहान मुलांची गर्दी

बारामती : बारामती एमआयडीसी येथे सुभद्रा मॉलमध्ये खेळता खेळता वरून पडल्याने पार्थ प्रशांत  हिंगाने ( वय 5 वर्ष ) या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.रविवारी ( दि 9) रात्री ही घटना घडली .रात्री ८ वाजल्यापासुन हा मुलगा बेपत्ता होता. पार्थचे नातेवाईक ,पोलीस सर्व मिळून शोध घेत होते .या दरम्यान त्याचा शोध घेत असताना  मॉलच्या पार्किंग मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.
 मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिल मुळे पार्थ याचा मृत्यू झाला आहे.. पार्थ याचे वडील प्रशांत हिंगाने याच्या वडिलांचे सुभद्रा मॉल मध्ये श्रीपाद फेशन वर्ल्ड नावाचे दुकान आहे . ' सुभद्रा'मॉलमध्ये देशातील नामांकित ब्रँड चे विविध कपड्यांचे , इलेक्ट्रॉनिक्स , वस्तू , किराणा , फर्निचर आदींचे मॉल आहेत .लहान मुलांसाठी गेम झोन सुरू करण्यात आला आहे .सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे लहान मुलांची गर्दी होत आहे .पार्थ याच्या म्रुत्युमुळे पालक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे .
पार्थ याच्या दुर्दैवी म्रूत्यूनंतर देखील  मॉलमधील मल्टिफ्लेक्स चित्रपट गृहामध्ये चित्रपट सुरू ठेवण्यात आला होता .व्यवस्थापन इतके बेफिकीर असल्याची तीव्र  प्रतिक्रिया बारामतीकरांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे .
सर्व पालकांनी सुद्धा आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. इथुन पुढ अशी दुर्घटना घडू नये म्हणून आपण सर्व नागरिक जागरुक रहावे , असे आवाहन देखील करण्यात आले आहे .पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .अधिक तपास हवालदार दत्तात्रय  सोननिस करत आहेत.

Web Title: Unfortunatly death of a child due to falling in mall at Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.