Under the Pradhanmantri Awas Yojana, 3,500 affordable homes from the municipal corporation | प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत महापालिकेकडून ३,५०० परवडणारी घरे
प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत महापालिकेकडून ३,५०० परवडणारी घरे

पुणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत शहरातील विविध भागात परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या वतीने ३ हजार ४४५ घरांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, हा अहवाल म्हाडाकडे दाखल केला आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत योजनेअतंर्गत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी येथे सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये आठ जागा पालिकेने निश्चित केल्या आहेत. या जागेवर ६१ इमारती बांधल्या जाणार असून त्यामध्ये ६ हजार ३२४ सदनिका बांधल्या जाणार आहेत. याचा डीपीआर पालिकेने राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्यातील काही डीपीआरमध्ये आक्षेप काढण्यात आला असून ३ हजार ४४५ घरांचा डीपीआर मान्य करण्यात आल्याने तो म्हाडाकडे पाठविण्यात आला आहे.
प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने परवडणारी घरे ही संकल्पना केंद्र सरकारने मांडली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाचे देशात कोठेच हक्काचे घर नाही, अशांना या योजनेअंतर्गत हक्काचे घर देण्यात येणार आहे. शहरी भागात झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी भागीदारीद्वारे परवडणाºया घरांची निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अशा विभागांत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

परवडणाºया घरांसाठी १ लाख १३ हजार २२८ अर्ज
महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात परवडणाºया घरांचे प्रकल्प उभे करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने नागरिकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्या आले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत २८ हजार ९०, कर्ज संलग्न व्याज अनुदानासाठी २८ हजार १४८, परवडणाºया घरांसाठी ४१ हजार ७८३ तर वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी अनुदानासाठी १५ हजार २०७ असे सुमारे एक लाख १३ हजार २२८ अर्ज आले आहेत. या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.


Web Title: Under the Pradhanmantri Awas Yojana, 3,500 affordable homes from the municipal corporation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.