वनजमिनीत अनधिकृत जलवाहिन्या, १४ आरोपींची जामिनावर मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:01 AM2018-01-01T04:01:40+5:302018-01-01T04:02:22+5:30

इंदापूर तालुक्यातील राजवडी व बिजवडी भागातील वनविभागाच्या जमिनीवर अनाधिकाराने प्रवेश करून अवैध जलवाहिन्या टाकल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या चौदा आरोपींची इंदापूर न्यायालयाने चौकशीसाठी नियमित हजेरी लावण्याचा आदेश देऊन जामिनावर मुक्तता केली आहे.

Unauthorized water deposits in forest land, 14 accused released on bail | वनजमिनीत अनधिकृत जलवाहिन्या, १४ आरोपींची जामिनावर मुक्तता

वनजमिनीत अनधिकृत जलवाहिन्या, १४ आरोपींची जामिनावर मुक्तता

Next

इंदापूर : तालुक्यातील राजवडी व बिजवडी भागातील वनविभागाच्या जमिनीवर अनाधिकाराने प्रवेश करून अवैध जलवाहिन्या टाकल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या चौदा आरोपींची इंदापूर न्यायालयाने चौकशीसाठी नियमित हजेरी लावण्याचा आदेश देऊन जामिनावर मुक्तता केली आहे.
मनोज मधुकर भोंगळे (वय ३८), अमोल अंकुश भोंगळे (वय ३०), धोंडीराम जगन्नाथ जाधव
(वय ३२), भाऊसाहेब संभाजी
आटोळे (वय ३०), राघू बाबा यादव (वय ५५), सुभाष जोतीराम भोंगळे (वय ५५), सुभाष नागू नाळे (वय ३५), सुनील बाळू जाधव (वय ३१),
संतोष रतन भोंगळे (वय ३५), संदीप चंदर पवार (वय ३५), दादाराम दशरथ बोराटे (वय ४५ वर्षे सर्व रा. पोंदकुलवाडी), अनिल हरी गायकवाड (वय ३३), अशोक मल्हारी कोकणे (वय ५०, दोघे रा. राजवडी, ता. इंदापूर), महादेव विकास डोंबाळे (वय ३२, रा. तरंगवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
बिजवडी (ता. इंदापूर) येथील वनरक्षक संदीप सोमनाथ थोरात
यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. वनपाल प्रकाश दामोदर चौधरी यांनी पुढील कारवाई केली आहे. आरोपींनी दि. २६ डिसेंबर रोजी राजवडी (ता. इंदापूर) वनविभागाच्या जमीन गट नं. ३३ व बिजवडी (ता. इंदापूर) जमीन गट नं. २० मध्ये अनाधिकाराने प्रवेश केला.
मशिनच्या साहाय्याने ६६५
मीटर लांब, ४ मीटर रुंद, ६४० मीटर लांब व २ मीटर रुंद, ११५ मीटर लांब व १ मीटर रुंद अशा वेगवेगळ्या आकाराच्या चाºया घेऊन
त्यामध्ये पाच इंच व्यासाच्या १४ जलवाहिन्या बसवल्या असल्याचा गुन्हा दि. २६ डिसेंबर रोजी उघडकीस आला.

वनपाल प्रकाश चौधरी, वनरक्षक संदीप थोरात व त्यांच्या सहकाºयांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट दिली. त्याच दिवशी प्राथमिक स्वरूपात आरोपींवर वनगुन्हा दाखल केला.
दुसºया दिवशी आरोपींना बोलावून त्यांचे जबाब घेतले. भारतीय वन अधिनियमनानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
इंदापूर न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी सोमवार व गुरुवारी हजेरी लावण्याचे आदेश देऊन न्यायालयाने आरोपींची जामिनावर मुक्तता केली. अधिक तपास वनपाल प्रकाश चौधरी करत आहेत.

Web Title: Unauthorized water deposits in forest land, 14 accused released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.