बारामती तालुक्यात किराणा दुकानातील अनधिकृत १२५ अधिक सिलेंडर जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:14 PM2018-10-22T22:14:25+5:302018-10-22T22:17:25+5:30

मुरुम-वाणेवाडी या रस्त्यावर किराणा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत गॅस टाक्या विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे शोध पथकाला समजली होती.

Unauthorized 125 more cylinders seized in kirana shops in Baramati taluka | बारामती तालुक्यात किराणा दुकानातील अनधिकृत १२५ अधिक सिलेंडर जप्त 

बारामती तालुक्यात किराणा दुकानातील अनधिकृत १२५ अधिक सिलेंडर जप्त 

Next
ठळक मुद्देसोमेश्वरनगर परिसरात याअगोदरही अनधिकृत गॅस एजन्सीवर कारवाईरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

सोमेश्वरनगर : मुरुम (ता. बारामती) येथील सचिन शंकरराव उगले यांच्या मालकीच्या श्री स्वामी समर्थ किराणा स्टोअर्स या दुकानामध्ये अनधिकृत असलेल्या सव्वाशेच्यावर घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. बारामती पुरवठा विभाग, गुन्हे शोध आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोमवारी (दि. २२) दुपारी संयुक्त कारवाई करत जप्त केल्या. 
मुरुम-वाणेवाडी या रस्त्यावर सचिन उगले यांच्या स्वामी समर्थ किराणा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत गॅस टाक्या विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे शोध पथकाला समजली होती. या विभागाने बारामती पुरवठा विभागास संपर्क साधून माहिती दिल्यानंतर सोमवारी तालुका पुरवठा अधिकारी संजय स्वामी आणि नायब तहसीलदार महादेव भोसले, गुप्तचर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस कर्मचारी अनिल काळे, रविराज कोकरे, उपनिरीक्षक जी. टी. संकपाळ, पोलीस नाईक सचिन वाघ, काशिनाथ नागराळे, तलाठी ए. डी. होळकर यांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली. या ठिकाणी अवैधरीत्या गॅसचा साठा करणे, वाहनांमध्ये गॅस भरून देणे, विविध गॅस एजन्सीच्या टाक्या गोडावूनमध्ये ठेवणे अशी कामे या ठिकाणी होत असल्याची माहिती या विभागाला मिळाली. त्यानंतर धाड टाकत ही कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी सव्वाशेच्यावर टाक्यामध्ये घरगुती वापराच्या, व्यावसायिक वापराच्या, पाच किलो आदी प्रकारच्या टाक्या या कारवाईत हस्तगत करण्यात आल्या. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सोमेश्वरनगर परिसरात याअगोदरही अनधिकृत गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, यात अजूनही बदल झाला नाही. सोमेश्वरनगर येथे अशा प्रकारच्या गॅस एजन्सी सुरू आहेत, यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
 

Web Title: Unauthorized 125 more cylinders seized in kirana shops in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.