तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 05:22 PM2018-08-22T17:22:38+5:302018-08-22T17:24:10+5:30

उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत.

Ujni dam water stock has 72% | तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के भरले

तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के भरले

Next
ठळक मुद्देभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पळसदेव : तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के झाले आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून उजनीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बुधवारी (दि. २२आॅगस्ट) दुपारपर्यंत उजनी धरण ७२ टक्के झाले होते.
उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिका यांचा पाणीपुरवठाही उजनी जलाशयातून होतो. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने सर्वच धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, बॅकवॉटरलगतचा शेतकरी खूष आहे. 
बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणात दौंड येथून ६० हजार ५००  क्युसेक, तर बंडगार्डन येथून  ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. बुधवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी एक परिपत्रक काढून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उपयुक्त साठा ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने या परिस्थितीत उजनी धरणातून भीमा नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. 
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप काढून घ्यावेत, तसेच नदीपात्रातून बंधाऱ्यावरून दळण -वळण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने सोलापूर, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व सोलापूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी (मुलकी) ता. माढा व बारामती. तसेच इंदापूर, माढा, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर येथील तहसीलदार यांना प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

Web Title: Ujni dam water stock has 72%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.