udayanraje bhosale Nilu phule style speech, alligation on modi sarkar | 'हा निळू फुलेंच्या तालीमतला पठ्ठ्याय, मायला.. ह्यांच्याकडं बघूनच घेतो' 
'हा निळू फुलेंच्या तालीमतला पठ्ठ्याय, मायला.. ह्यांच्याकडं बघूनच घेतो' 

पुणे - खासदार उदनयराजे भोसले यांनी मोदी सरकारवर टीका करताना निळू फुले स्टाईलचा वापर केला. मी निळू फुलेंच्या तालमीमध्ये तयार झालेला पठ्ठ्याय मी. ह्याच्या मायला ह्याच्या बघूनच घेतो, असे म्हणत उदयनराजेंनी मोदी सरकार आणि त्यांच्या कामकाजावर टीका केली. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उदयनराजेंची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, उदयनराजेंनी मोदी सरकारकडून फसवणूक झाल्याचे म्हटले.

पार्थ पवार आता उमेदवार आहेत, पण माझ्यासोबत लवकरच खासदार बनणार असल्याचे सांगत उदयनराजेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुण्यात पावसाचे वातावरण होते, पाऊसाचे थेंबही अंगावर पडत होते. तरीही, उदयनराजेंच्या सभेला लोकांनी गर्दी केली होती. मोदी सरकारने देशातील लोकांची फसवणूक केली. लोकांनी, या लोकशाहीतील राजांनी म्हणजेच तुम्ही मोठ्या अपेक्षेने देश मोदींच्या हातात दिला. रोजगार मिळतील, 15 लाख मिळतील, नोकऱ्या मिळतील, असा विश्वास तुम्हाला होता. पण, सरकारने गेसाने तुमचा गळा कापल्याची टीकी उदनयराजेंनी केली. मात्र, मी हे करुन दाखवतो. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो. हो हे शक्य आहे, असेही भोसलेंनी म्हटले. 

मी निळू फुलेंच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्याय, ह्याच्या मायला ह्याच्या बघूनच घेतो. पण, मी कधी बघून घेऊ शकतो, ज्यावेळी तुमच्या सर्वांची साथ असेल तर, असेही उदयनराजेंनी म्हटले. तसेच मी एमी म्हणजे मेंबर ऑफ पार्टीमेंट नसून तुमच्या सर्वांची रक्षा करणारा मिल्ट्री पोलीस आहे. दरम्यान, आपल्या भाषणात उदयनराजेंनी नाव न घेता अंबानींनाही लक्ष्य केलं. सरकारने काही जणांना मोठं केलंय, आज त्यांच्याकडे देशाच्या अर्थसंकल्पापेक्षाही जास्त संपत्ती आहे. गॅस, पेट्रोल, नॅचरल क्रुड ऑईल हे सर्व कोणाच्या मालकीचं आहे, असे म्हणत सरकारने देश विकल्याचा आरोपही उदनयराजेंनी केला.   


Web Title: udayanraje bhosale Nilu phule style speech, alligation on modi sarkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.