कोंढवा - सासवड बायपासवर ट्रकच्या धडकेत दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 04:23 PM2019-05-17T16:23:58+5:302019-05-17T16:27:27+5:30

कोंढवा- सासवड बायपासवर पिसोळी येथे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत.

Two person death in truck accident on kondhva- saswad bypass | कोंढवा - सासवड बायपासवर ट्रकच्या धडकेत दोन ठार

कोंढवा - सासवड बायपासवर ट्रकच्या धडकेत दोन ठार

Next

कोंढवा : कोंढवा- सासवड बायपासवर पिसोळी येथे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत. भरधाव वेगाने जाणारा ट्रक व दुचाकी यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून दुसरा जण उपचार घेत असताना दवाखान्यात मयत झाला आहे. पिसोळी येथील आदी स्टोन मारबल या दुकानासमोर हा भीषण अपघात झाला आहे. राम अगधं माने (वय २६) व बबन महादेव इंगळे (वय २६ , दोघे रा.वाघजाईनगर,कात्रज )अशी मयत झालेल्या व्यक्तीची नावे आहे. ट्रकचालक राजेश पासवान (वय ३७, समृध्दी नगर, बिहार) याला पोलिसांनी अटक केलेली आहे.राम व बबन हे दोघे वायरमनचे काम करण्यासाठी कात्रज येथून हांडेवाडी चौकात जात होते. पिसोळी येथे असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना उडविले. यात राम जागीच ठार झाला तर बबनला स्थानिक नागरिकांनी खाजगी दवाखान्यात नेले. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक वाडकर पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Two person death in truck accident on kondhva- saswad bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.