Two person death in accident; One injured at patas | पाटसला अपघातात दोन ठार ; एक जखमी 
पाटसला अपघातात दोन ठार ; एक जखमी 

ठळक मुद्दे हा अपघात सोमवारी ( दि. १९ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.

पाटस : पुणे- सोलापूर महामार्गाजवळ बारामती चौफुल्याजवळ टेम्पोने इंडिका कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात संजय नेरु शेळके (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश साळुंके यांना रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वी मृत्यू झाला. दरम्यान, दिपक परमाळ (वय ४०) हे जखमी झाले आहेत. अपघातातील तिघेही प्रवासी यशवंतनगर,अकलूज,जि. सोलापूर) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी ( दि. १९ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. सर्वजण दिपक परमाळ यांच्या आईला पुण्याला रुग्णालयात भेटण्यासाठी निघाले होते. मात्र,इंडिका गाडी क्र.(एम.एच. ४३. ऐ. ७८२२ ) ने निघाले होते .त्यांच्या गाडीचा आवाज झाला. कशाचा आवाज म्हणून झाला हे पाहण्यासाठी इंडिकातील दोघे बारामती चौफुल्यावर खाली उतरले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला.  


Web Title: Two person death in accident; One injured at patas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.