बसच्या सीटमुळे प्रवाशाची पॅंट फाटली, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 12:41 PM2018-01-18T12:41:33+5:302018-01-18T12:46:01+5:30

बसमधून प्रवास करताना खराब सीटमुळे पँट फाटल्याने पोलिसांत तक्रार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) बसमधून प्रवास करताना बसमधील बाहेर आलेल्या धातूच्या पट्टीमुळे पँट फाटल्याने एका प्रवाशाने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

travelers pant torn in pmp bus files complaint | बसच्या सीटमुळे प्रवाशाची पॅंट फाटली, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

बसच्या सीटमुळे प्रवाशाची पॅंट फाटली, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

Next

पुणे : बसमधून प्रवास करताना खराब सीटमुळे पँट फाटल्याने पोलिसांत तक्रार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) बसमधून प्रवास करताना बसमधील बाहेर आलेल्या धातूच्या पट्टीमुळे पँट फाटल्याने एका प्रवाशाने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पीएमपी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करून नुकसानीची भरपाई देण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. 
संजय लक्ष्मण शितोळे (रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यान घडली. 
सातारा रस्त्यावरील पद्मावती ते कात्रज दरम्यान शितोळे प्रवास करीत होते. बसमधून उतरत असताना बसच्या हँडरेस्टच्या बाहेर आलेल्या लोखंडी पट्टीमुळे पँट फाटली. यामुळे इजा झाली नसली तरी माझे नुकसान झाले. मी बसचा नियमित प्रवासी असून, पासधारक आहे. पीएमपी प्रशासनाने योग्य ती दक्षता न घेतल्याने माझे १ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच या बसमध्ये फर्स्टएड बॉक्स, अग्निशमन सिलिंडर आढळून आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: travelers pant torn in pmp bus files complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.