बंदोबस्तात दूध वाहतूक!, संकलन बंद, मात्र तुटवडा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:28 PM2018-07-19T23:28:06+5:302018-07-19T23:28:19+5:30

भोर तालुक्यातील शेतकरी, दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले असून, दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला पाठिंबा दिला

The transportation of milk in the neighborhood !, the collection is closed, but there is no scarcity | बंदोबस्तात दूध वाहतूक!, संकलन बंद, मात्र तुटवडा नाही

बंदोबस्तात दूध वाहतूक!, संकलन बंद, मात्र तुटवडा नाही

Next

पुणे- भोर तालुक्यातील शेतकरी, दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले असून, दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात होणारा दुधाचा पुरवठा बंद झाला आहे. यामुळे दुधाचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
भोर शहरातील रामबाग येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या दूध संकलन केंद्रावर दररोज ७,५०० लिटर, तर अनंत दूध या खासगी संस्थेचे ८ हजार लिटर व घरोघरी जाऊन खासगी दूध घालणाऱ्या शेतकºयांकडील २,५०० हजार लिटर असे १८ ते २० हजार लिटर दूध दररोज भोर तालुक्यातील पश्चिम भागातून जाते. मात्र, जिल्हा दूध संघ व अनंत दूध डेअरीवरील दूधसंकलन तसेच खासगी दूध उत्पादकांचे दुधाचे संकलन बंद आहे. आजपासून दुधाचा तुटवडा भासू लागला आहे. शिरूर तालुक्यात सरासरी पाच ते सहा लाख लिटर दुधाचे संकलन होत असून, या संकलनावर आंदोलनाचा संमिश्र परिणाम दिसत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वाधिक दूधसंकलन असणाºया इनामगाव, मांडवगण फराटा या गावांत मात्र संकलनावर परिणाम जाणवत आहे.
तालुक्यात होत असलेल्या पाच ते सहा लाख लिटर दुधापैकी पूर्व भागात सर्वाधिक दीड लाख लिटरपर्यंत संकलन होते. यात इनामगाव, मांडवगण फराटा, निमोणे, नागरगाव, गणेगाव या गावांत सर्वाधिक संकलन होते. या गावांमध्ये राजू शेट्टींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूधसंकलन ठप्प झाल्याचे चित्र आहे.
निमोण्यात मात्र अल्पसा प्रतिसाद जाणवला. इनामगावात शेतकºयांनी रस्त्यावर येऊन दुधाने अंघोळ करून आंदोलन केले. इनामगावमध्ये दररोज २५ हजार लिटर दुधाचे संकलन
होते. या संकलनावर परिणाम झाला आहे. वर्षभरापूर्वी दुधाला २९ ते ३० रुपये प्रतिलिटर भाव मिळत
होता. तो १६ ते १७ रुपयांवर पोहोचल्याने दर दिवसाला एकट्या इनामगावात तीन लाख रुपयांचा दूधधंद्याला फटका बसल्याचे इनामगावचे रहिवासी, श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास धाडगे यांनी सांगितले. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शेतकºयांनी महादेवाच्या पिंडीला दुधाने अभिषेक घालून आंदोलन केले.
>महामार्गावर सतत पोलिसांचा पहारा
पळसदेव : इंदापूर तालुका हा दूधधंद्यात अग्रेसर आहे. नेचर डिलाईट डेअरी, सोनाई दूध संघ, मंगलसिद्धी दूध संघ या खासगी प्रकल्पासह दूधगंगा हा सहकारी दूध संघ आहे. दररोज या दूध संघांचे ५० लाख लिटर एकत्रित मिळून ‘संकलन’ आहे. चार दिवसांपासून दूध वाहतूक रोखण्यात येत आहे. असे असतानासुद्धा पुणे, मुंबई या शहरांना पोलीस बंदोबस्तात येथून दूधपुरवठा सुरू आहे. महामार्गावर सतत पोलिसांचा कडक पहारा व गस्त सुरू आहे. भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी सांगितले, एक पथक तैनात आहे. तर, २५ पोलिसांची सतत गस्त (पेट्रोलिंग) सुरू आहे.
>पुरंदर तालुक्यात निम्मे संकलन घटले
जेजुरी : या आंदोलनाला पुरंदरमधून मात्र संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी दूध संकलन संस्था आनंदी दूध या संस्थेचे दररोजचे साधारणपणे २८ ते ३० हजार लिटर दूध संकलन होते. आंदोलनामुळे संकलनावर परिणाम झाला आहे. हे संकलन २० ते २१ हजार लिटरवर आलेले आहे. याशिवाय अनंत, सोनाई, डायनॅमिक्स, टेकवडे अ‍ॅग्रो या दूधसंकलन संस्थांवरही परिणाम झाला आहे. या सर्वच संस्थांचे दररोजचे ७० ते ७५ हजार लिटर दूधसंकलन आहे. आंदोलनामुळे ते ५० ते ५५ हजार लिटरवर आलेले आहे. आंदोलनात दूध उत्पादकांनी सहभाग घेतल्याचे दिसत असले, तरीही तो संमिश्र आहे. अनेक
दूध उत्पादक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
सासवड आणि जेजुरी ही दोन मोठी नगरपालिका असणारी शहरे आहेत. येथील मोठ्या नागरी वस्तीची दररोज ३० ते ३५ हजार लिटर दुधाची गरज दूधविक्रेते भागवतात. गोकुळ, सोनाई, गोविंद, स्वराज, नवनाथ, आनंदी या संस्थांचे दूध विक्रीसाठी येत आहे. दूध संस्थांच्या गाड्या बाहेरून येत असतात. आंदोलकांच्या भीतीने वाहने येत नसल्याने विक्रेत्यांना खासगी गाड्या पाठवून दूध आणावे लागत आहे.

Web Title: The transportation of milk in the neighborhood !, the collection is closed, but there is no scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.