एक्सप्रेस वेवर ऑईल सांडले; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 09:47 AM2018-08-14T09:47:04+5:302018-08-14T09:48:46+5:30

पहाटेच्या सुमारास किमी 37 या ठिकाणाजवळ हा अपघात झाला.

Traffic Jam at Pune-Mumbai Expressway as Oil Spill after Accident; Transport disrupted to Mumbai | एक्सप्रेस वेवर ऑईल सांडले; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

एक्सप्रेस वेवर ऑईल सांडले; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

Next

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली गावाच्या हद्दीत बोरघाटातील उतारावर साखरेचा ट्रक पलटी झाला. यावेळी ट्रकमधील ऑईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास किमी 37 या ठिकाणाजवळ हा अपघात झाला.


ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून उलटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. यामध्ये कोणी जखमी नसले तरी अपघातानंतर रस्त्यावर ऑईल पसरल्याने वाहने संथगतीने जात होती. यामुळे काहीकाळ एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग व खोपोली पोलीस तसेच आयआरबी पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला आले. सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ऑईलवर माती टाकत वाहतूक सुरु केली. अपघातग्रस्त ट्रक बाजुला करत सध्या संथगतीने वाहतूक सुरु आहे.
 

Web Title: Traffic Jam at Pune-Mumbai Expressway as Oil Spill after Accident; Transport disrupted to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.