पुणे : टेम्पो अडवून चालकाला शिवीगाळ करून त्याच्याकडील ५ हजार रुपये लुबाडणाऱ्या ३ जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
रॉनी स्टॅनिस पंडित (वय २६, रा. चंद्रमानगर, येरवडा), रोहन सुहास जोशी (वय २७, रा. कळस, विश्रांतवाडी) आणि पंकज सुभाष कांबळे (वय ३१, रा. प्रादेशिक मनोरुग्णालय कर्मचारी वसाहत, येरवडा) अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सचिन काळुराम डोंगरे (वय ३७, रा. कुरळी, मऱ्हेवस्ती, खेड) यांनी फिर्याद दिली होती़ ही घटना येरवडा पोस्ट आॅफिसजवळ
१७ मार्च रोजी रात्री दोनच्यादरम्यान घडली.
सचिन डोंगरे टेम्पोचालक राजू शेठ याच्याबरोबर टेम्पोमध्ये माल भरून बार्शीला जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून चालकाच्या खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले होते़ पोलिसांनी तिघांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले़ अधिक तपास करण्यासाठी त्यांना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.