पुणे-सातारा रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 08:37 AM2019-07-23T08:37:54+5:302019-07-23T08:38:11+5:30

पुणे-सातारा रोडवर झाला भीषण अपघात शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर झाला भीषण अपघात

Three killed, five injured in accident on Pune-Satara Road | पुणे-सातारा रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, पाच जखमी

पुणे-सातारा रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, पाच जखमी

Next

पुणे - पुण्यातील तळजाई पठार येथील तरुण शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला मोटारसायकलवरुन जात होते.  ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यु झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघातपुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. हे सर्व तरुण तळजाई येथील राहणारे आहेत. अनिकेत भारत रणदिवे (वय २३), सुशील गोपाळ कांबळे (वय २३, रा. तळजाई पठार) आणि सुरज काका शिंदे (वय २४)अशी अपघातात मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

अनिकेत रणदिवे, करण जाधव, राकेश क-हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांना ससेवाडी येथील श्र्लोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

याबाबतची माहिती अशी, तळजाई पठार परिसरात राहणाऱ्या या मित्रांनी सोमवारी रात्री पार्टी केली. त्यानंतर त्यांचे शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला जायचे ठरले. मध्यरात्री साडेबारा वाजता  ३ मोटारसायकलवरुन ८ जण निघाले. सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे आले असताना पाठीमागून सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकची त्यांच्या तीनही मोटारसायकलला धडक बसली. त्यात ८ जण जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या श्र्लोक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यात दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला असून उपचार सुरु असताना अनिकेत रणदिवे याचा मृत्यू झाला.

Web Title: Three killed, five injured in accident on Pune-Satara Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.