तिघांना अटक : डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:42 AM2018-07-10T02:42:34+5:302018-07-10T02:42:37+5:30

मित्रांच्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तीन मित्रांनी एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे.

 Three arrested | तिघांना अटक : डोक्यात दगड घालून खून

तिघांना अटक : डोक्यात दगड घालून खून

Next

पुणे : मित्रांच्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तीन मित्रांनी एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे़ ही घटना रविवारी रात्री पानशेत धरण परिसरातील मौसे गावाजवळ घडली़
योगेश हरिभाऊ ढोणे (वय २५, रा़ कामठेवस्ती, शिवणे) असे खून झालेल्याचे नाव आहे़ याप्रकरणी गणेश बाळासाहेब कवळे (वय २०, रा़ शिवणे), भूषण विजय गायकवाड (वय २३, रा़ रामनगर, वारजे माळवाडी), आणि मंदार अशोक शिंदे (वय २७, रा़ रामनगर, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
पोलीस संतोष सावंत यांना खुनाबाबत माहिती मिळाली होती़ त्यावरून पोलीस पथकाने गणेश कवळे याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली़ योगेश ढोणे व इतर तिघे हे मित्र असून, योगेश हा मित्रांच्या पत्नीला अपशब्द वापरत होता़ यावरून त्यांच्यात वाद झाला होता़ या रागातून तिघांनी योगेश याला खडकवासला भागात नेले़ तेथे त्याला दारू पाजली़ त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकून दिला़ ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपीला घेऊन शोध घेतल्यावर वेल्हे तालुक्यातील मोसे गावाजवळ योगेशचा मृतदेह मिळून आला़
पोलिसांनी त्यानंतर इतर दोघांना ताब्यात घेतले़ ही घटना वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याने अधिक तपासासाठी तिघांना ताब्यात दिले आहे़ दरम्यान, योगेश ढोणे हा रात्रभर घरी आला नाही़ तो पालखीला गेला असावा, असे समजून त्याच्या नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला नाही की, पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती़ सिंहगड पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन हा गुन्हा उघडकीस आणला़

Web Title:  Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.