जे लाेक पहिल्या बाॅलवर आऊट हाेतात त्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 09:57 PM2019-04-20T21:57:23+5:302019-04-20T22:00:15+5:30

सिंहगड राेड येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ मुख्यंमत्र्यांच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर जाेरदार टीका केली.

those who out at first ball they should not teach us cricket : chief minister | जे लाेक पहिल्या बाॅलवर आऊट हाेतात त्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये : मुख्यमंत्री

जे लाेक पहिल्या बाॅलवर आऊट हाेतात त्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये : मुख्यमंत्री

Next

पुणे : राष्ट्रवादीला भाड्याने वक्ते आणावे लागत आहेत. बस, सायकल भाड्याने घेतात पण पवार साहेबांनी इंजिन घेतलं आहे. तेही बंद पडलेलं आहे. ते ना विधानसभेत चाललं, ना पालिकांमध्ये जे लोक पहिल्या बॉलवर आउट होतात त्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केली. 

पुण्यात सिंहगड राेडवरील वडगाव बुद्रुक येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. याच मैदानावर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची सभा झाली हाेती. त्यावेळी त्यांनी भाजपावर जाेरदार टीका केली. आज मुख्यमंत्र्यांनी त्याच मैदानावर सभा घेत राज ठाकरेंवर टीकेची झाेड उठवली. 

मुख्यमंत्री म्हणाले, कितीही वेळा म्हणालात लाव रे व्हिडीओ, लाव रे व्हिडीओ मग जर 2014सालचा व्हिडीओ लावला तर काय होईल? नरेंद्र मोदी यांनी संगीतले त्याप्रमाणे आता शरद पवार आता 'बेटी बचाव बेटी बचाव' करत आहेत. सुप्रिया सुळे यांनीही मोदी यांचा गुण घेतला आहे.त्यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या 'घरात घुसून मारण्याची' भाषा करत आहेत.राहुल गांधी यांचे पणजोबा, आजी, वडील आले पण गरिबी हटवली नाही. आता काय खाऊन ते गरिबी हटवणार ?

Web Title: those who out at first ball they should not teach us cricket : chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.