स्मार्ट सिटीच्या सायकलींना मिळेना चालक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 06:52 PM2018-12-17T18:52:00+5:302018-12-17T18:53:41+5:30

पुणे स्मार्ट सिटीकडून वर्षभरापूर्वी शहरात सुरु करण्यात अालेली स्मार्ट सायकल शेअरिंग ही याेजनेला सध्या प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे.

there is low response to smart cycle sharing scheme | स्मार्ट सिटीच्या सायकलींना मिळेना चालक

स्मार्ट सिटीच्या सायकलींना मिळेना चालक

Next

पुणे : पुणेस्मार्ट सिटीकडून माेठा गाजावाजा करत स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना सुरु करण्यात अाली. या याेजनेअंतर्गत शहरातील विविध भागात भाड्याने सायकल मिळण्यास सुरुवात झाली. यात अनेक कंपन्यांनी देखील सहभाग घेतला. सुरुवातीला या याेजनेेला पुणेकरांना चांगला प्रतिसाद दिला. परंतु सध्याचे शहरातील चित्र पाहता या साकलींना चालकच मिळत नसल्याचे दिसून येत अाहे. परिणामी रस्त्यांवर या सायकली धूळ खात पडल्या अाहेत. 

     वर्षभरापूर्वी पुण्यात स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना सुरु करण्यात अाली. सुरुवातील या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला एकाच कंपनीच्या मार्फत सायकल पुरुविण्यात अाल्या. त्यानंतर इतर काही कंपन्या या याेजनेत सहभागी झाल्या. या याेजनेला सायकल चाेरीचे तसेच ताेडफाेडीचे ग्रहण लागले. ज्या प्रमाणात सायकल वाढल्या त्या प्रमाणात त्यांचे वापरकर्ते न वाढल्याने सध्या या सायकली रस्त्यांवर धूळ खात पडून अाहेत. पुण्याला पुन्हा सायकलींचे शहर करण्याच्या हेतूने ही याेजना सुरु करण्यात अाली असली तरी नागरिकांमध्ये या याेजनेबाबात फारशी जनजागृती करण्यात न अाल्याने पुण्याला पुन्हा एकदा सायकलींचे शहर करण्याचा हेतू हवेतच विरुन गेला. या सायकलींचा बराचसा वापरकर्ता हा महाविद्यालयीन तरुण तरुणी अाहेत. इतर नागरिकांना या याेजनेची माहिती नसल्याने तसेच ही सायकल वापरायला कशी घ्यायची याबद्दल त्यांना माहिती नसल्याने त्यांना या याेजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे नुसत्या सायकलींची संख्या वाढवल्याने पुणे सायकलींचे शहर हाेणार अाहे की त्यांचा वापरही हाेणार असा प्रश्न विचारला जात अाहे. 

     स्मार्ट सिटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात सध्या 7 ते 8 हजार सायकल अाहेत. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात जास्त वापर हाेत असल्याचे त्यांचे  म्हणणे अाहे. शहरातील चित्र मात्र वेगळेच अाहे. या सायकलींचा जास्तीत जास्त वापर व्हायचा असेल तर ही याेजना सर्वसामान्यांपर्यंत पाेहचणे अावश्यक अाहे. अन्यथा सायकलींची संख्या फुटपाथवर वाढतील मात्र त्यांचा वापर हाेणार नाही. 

Web Title: there is low response to smart cycle sharing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.