...तर मी महाराष्ट्र कसा घडवेन हे तुम्ही पाहाच; कुस्तीच्या फडात 'राज'गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 08:37 AM2018-09-04T08:37:01+5:302018-09-04T08:43:30+5:30

आमदार सोनवणे यांनी बांधलेल्या श्रीकृष्ण रामजी तांबे (झांबरशेठ) स्टेडिअमची भव्यता पाहता महाराष्ट्रात असा आखाडा असेल, असे वाटत नाही.

... then you see what will happen in Maharashtra, 'Raj' in the wrestling fame | ...तर मी महाराष्ट्र कसा घडवेन हे तुम्ही पाहाच; कुस्तीच्या फडात 'राज'गर्जना

...तर मी महाराष्ट्र कसा घडवेन हे तुम्ही पाहाच; कुस्तीच्या फडात 'राज'गर्जना

Next

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांचे तोंड भरून कौतूक केले. तसेच, तुमच्यासारखे 288 आमदार मला भेटल्यास, मी काय महाराष्ट्र घडवेन ते तुम्ही पाहाच, असेही राज यांनी म्हटले. ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात आमदार सोनवणे यांनी उभारलेल्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  

आमदार सोनवणे यांनी बांधलेल्या श्रीकृष्ण रामजी तांबे (झांबरशेठ) स्टेडिअमची भव्यता पाहता महाराष्ट्रात असा आखाडा असेल, असे वाटत नाही. मी असे आमदार पाहिले आहेत की, ज्यांनी लोकांचे पैसे स्वतःच्या खिशात घातले, सोनवणे यांनी मात्र लोकांसाठी खिशातला पैसा बाहेर काढला. असे जर 288 आमदार मिळाले, तर मी काय महाराष्ट्र घडवीन, हे तुम्ही पहाल,' असे राज यांनी म्हटले. तसेच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा नक्कीच विचारल केला जाईल, असे म्हणत लोकसभा निवडणुकांसाठी शिरुर मतदारसंघासाठी त्यांच्या नावाचे संकेतही दिले आहेत. बांदल यांच्या मागणीबाबत सोनवणे यांच्याशी विचारविनीमय करू, असेही राज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार सोनवणे यांनी स्वत: 75 लाख रुपये खर्चून हे स्टेडियम बांधल्याचे राज यांनी सांगितले.

Web Title: ... then you see what will happen in Maharashtra, 'Raj' in the wrestling fame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.