...तर ‘ससून’ला नेले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:53 AM2018-04-28T06:53:18+5:302018-04-28T06:53:18+5:30

पीएमपी वाहकाची अरेरावी; हात दाखवूनही बस नाही थांबली

... then 'saasoon' has been taken | ...तर ‘ससून’ला नेले असते

...तर ‘ससून’ला नेले असते

Next

पुणे : सातारा रस्त्यावरील पंचमी बसथांब्यावर निगडीला जाणाऱ्या पीएमपीची वाट पाहत होते. ही बस थांब्यावर येऊनदेखील थांबली नाही. त्यामुळे पळत जाऊन मी बसमध्ये चढले. वाहकाला म्हणाले, ‘बस का थांबवली नाही? मी बसमध्ये येताना अपघात झाला असता तर..?’ यावर वाहक म्हणाला, ‘ते चालकाला सांगा आणि काही झाले असते, तर ससूनला नेले असते...’ हा अनुभव आहे एका महिला प्रवाशाचा. वेळ मंगळवारी सकाळी ११ ची आणि बसचा क्रमांक एमएच १२-सीटी ००६१ हा होता.
पीएमपीचे चालक भरधाव बस चालवतात, अनेक थांब्यांवर ते गाडी न थांबवता पुढे नेतात, असे अनुभव अनेकदा प्रवाशांना येतात. परंतु, सध्या वाहक प्रवाशांवर अरेरावी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे प्रवाशांच्या म्हणण्यावरून दिसून येत आहे.
तुकाराम मुेढे हे पीएमपीचे अध्यक्ष असताना सर्व सुरळीत चालले होते. नियम मोडणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे निमूटपणे कर्मचारी काम करायचे; परंतु मुंढे यांची बदली झाली आणि पीएमपीच्या कर्मचाºयांमधील उद्धटपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पीएमपी वेळेवर येत नाहीत, तर अनेक
ठिकाणी दोन-दोन बस बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.
पीएमपीचे चालक थांब्यावर बस थांबवत नसल्याने अनेकांना कामाला किंंवा शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. एका प्रवाशाला मंगळवारी सकाळी सातारा रस्त्याहून निगडीची बस पकडायची होती. त्यामुळे तो पंचमी येथील थांब्यावर बसची वाट पाहत होता. बस आली तेव्हा या प्रवाशाने चालकाला हात दाखविला; परंतु त्याने बस थांबवलीच नाही. तशीच पुढे दामटली. तेव्हा प्रवाशाने पळत जाऊन बस पकडली. बसमध्ये गेल्यानंतर वाहकाला ‘बस का थांबवली नाही? मला पळत पळत बसमध्ये यावे लागले, जर अपघात झाला असता, तर काय केले असते तुम्ही?’ असे प्रवासी म्हणाला. यावर वाहक म्हणाला, ‘ते तुम्ही चालकाला सांगा की, का बस थांबवली नाही आणि तुम्हाला काही झाले असते, तर ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले असते.’ वाहकाच्या या बोलण्यावर बसमधील इतर प्रवासीदेखील संतापले. ‘या वाहकांना आता कोण बोलणार? मुंढे गेल्यामुळे यांचा मुजोरपणा वाढतोय,’ अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.

मुंढे गेल्यामुळे कर्मचाºयांमधील शिस्त शून्य झाली आहे. कसल्याही प्रकारचा आणि कोणाचाही त्यांना दरारा राहिलेला नाही. अधिकारी पूर्णत: मोकाट सुटले आहेत. काही वाहक बस चालवताना मोबाइलवर बोलतात. मोटार वाहन कायद्याप्रमाणे अशा चालकाचे लायसन्स रद्द केले पाहिजे. कुठलीही बस वेळेवर येत नाही. कोणावरही कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे वाहकांचा उद्धटपणा वाढला आहे. किंबहुना, प्रवासी मंचाच्या काही कार्यकर्त्यांकडून तक्रार केली असता, हेल्पलाईनला दमदाटी केली जाते. बसमध्ये प्रवासी सुरक्षितता राहिलेली नाही.
- जुगल राठी, प्रवासी मंच

Web Title: ... then 'saasoon' has been taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.