वाळूमाफियांची तहसीलदारांच्या हातावर तुरी, ट्रकमालक-चालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:25 AM2017-11-25T01:25:35+5:302017-11-25T01:26:49+5:30

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे तहसीलदार रणजित भोसले यांनी चार वाळूच्या वाहनांवर कारवाई केली.

Terror on the hands of the sand mafia tahsildar, the truck driver-driver was arrested | वाळूमाफियांची तहसीलदारांच्या हातावर तुरी, ट्रकमालक-चालकांवर गुन्हा दाखल

वाळूमाफियांची तहसीलदारांच्या हातावर तुरी, ट्रकमालक-चालकांवर गुन्हा दाखल

Next

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे तहसीलदार रणजित भोसले यांनी चार वाळूच्या वाहनांवर कारवाई केली. मात्र, माफियांनी तहसीलदार, मंडलाधिका-यांच्या हातावर तुरी देऊन चारही ट्रक रात्रीतून गायब केले. विशेष म्हणजे एका ट्रकच्या चारही चाकांची हवा सोडून देऊनही ट्रक फरार झाल्याने वाळू माफियांना अभय कोणाचे ? याची चर्चा रंगू लागल्यावर मंडलाधिका-यांनी ट्रकमालक-चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील पोलीस चौकीतून पाच वाळूचे ट्रक गायब होण्याच्या घटना ताजी आहेत. तसेच, शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जितेंद्र केशव मांडगे यांच्यावर वाळू व्यावसायिकांकडून लाच मागितल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केल्याचा प्रकारही नुकताच घडला आहे. यानंतर तालुक्यातील बड्या नेत्याच्या नातेवाइकांचे पकडलेले ट्रक तळेगाव येथील शासकीय गोदामातून गायब झाल्याच्या प्रकारामुळे महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
कोरेगाव भीमा येथे महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व कामगार तलाठ्यांची बैठक तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत मंडल कार्यालय कोरेगाव भीमा येथे सायंकाळी पार पडली. या बैठकीनंतर तहसीलदार रणजित भोसले यांनी मंडल अधिकारी ज्ञानोबा विश्वांबर कावळे, उद्धव नामदेव फुंदे, कामगार तलाठी सुहास अनंत नांगरे, ज्ञानदेव किसन वाळके, डी. एस. भराटे व कोतवाल संतोष शिंदे यांच्या पथकासह कोरेगाव भीमा येथे पुणे-नगर महामार्गावर रात्री दहाच्या सुमारास अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाºया वाळूच्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी थांबल्यानंतर ठराविक अंतराने एमएच १२-डीजी २६१७, एमएच १२-सीएच ५३३४, एमएच १२-एचडी ४८५४, एमएच १२-एमव्ही २६३३ हे वाळूचे ट्रक पकडले. या वाहनांमध्ये प्रत्येकी चार ब्र्रास वाळू असल्याने ही वाहने तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामामध्ये नेण्याच्या सूचना तहसीलदार रणजित भोसले यांनी भरारी पथकाला दिल्या. मात्र, एका ट्रकच्या (एमएच १२-सीएच ५३३४) चालकाने ट्रकचा स्ट्रार्टरच काढून नेल्याने ट्रक तळेगाव ढमढेरे येथे नेणे शक्य नव्हते. दरम्यान, उर्वरित ३ ट्रक तळेगाव गोदामामध्ये नेत असताना महसूलच्या कर्मचाºयांना दमदाटी करून शिवीगाळ करीत गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरवले. त्यानंतर महसूलचे उद्धव फुंदे, ज्ञानदेव वाळके, सुहास नांगरे, डी. एस. भराटे व फिर्यादी कावळे यांनाही ट्रकमधून खाली उतरवले. त्यानंतर ट्रकचालक ट्रकमालकांशी संगनमत करून तिन्ही ट्रक घेऊन तेथून फरार झाले.
एका ट्रकच्या चारही चाकांची हवा सोडून देण्यात आली व ट्रक डिंग्रजवाडी फाटा येथेच सोडून देण्यात आला. पोलीस व महसूलचे कर्मचारी त्या ठिकाणाहून जाताच ट्रकचालकांनी सदर ट्रकमध्ये पुन्हा हवा भरून ते पळवून नेण्यात यशस्वी झाले.
या चारही ट्रकचालक व ट्रकचे मालक एन. के. म्हस्के, गणेश वेताळ, दादा पाटील घावटे, गणेश पवार यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी व शिवीगाळ करून ट्रक व ट्रकमधील चार ब्रास वाळू चोरून नेल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>बड्या नेत्याच्या नातेवाइकांना अभय का?
शिरूर तालुक्यातील बड्या नेत्याच्या नातेवाइकाचे वाळूवाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमावर आहेत. या बेकायदा वाळूवाहतूक करणाºया ट्रकवर कारवाई करण्यात महसूल विभागामार्फत सूट दिली जात असल्याच्या तक्रारी होत असल्याने या बड्या नेत्याच्या नातेवाइकाला प्रशासन अभय का देत आहे? असा सवाल उपस्थित होतो.
>हवा भरणाºयावर कारवाई
होणार का?
कोरेगाव भीमा येथे महसूल विभागाने ट्रक पकडल्यानंतर ट्रकचालक ट्रकचा स्टार्टरच काढून पळून गेला. ट्रकची चारही चाकांची हाव सोडून देऊनही वाळू व्यावसायिक पुन्हा हवा भरून ट्रक पळवून नेण्यात यशस्वी झाल्याने या ट्रकच्या चाकात हवा भरणाºयावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Terror on the hands of the sand mafia tahsildar, the truck driver-driver was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे