युवक देणार समाजभानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:49 PM2018-05-24T17:49:49+5:302018-05-24T17:49:49+5:30

‘येथे थुंकू नये’, अशा पाट्या ठिकठिकाणी दिसतात. पण अनेकदा या पाट्यांवरच गुटखा, पानमसाला खाऊन थुंकल्याचे चित्र पाहायला मिळते.

Teachings of social welfare by the youth | युवक देणार समाजभानाचे धडे

युवक देणार समाजभानाचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देकुठेही थुंकण्याचे प्रकार रोखण्यासाठी युवक लोकांमध्ये जनजागृती सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे किंवा थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार

पुणे : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, थुंकून विद्रुपीकरण करणाऱ्यांना देशातील युवक समाजभानाचे धडे देणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या विरोधात युवकांना सहभागी करून घेत चळवळ उभी करण्याची सुचना सर्व विद्यापीठांना दिल्या आहेत. ‘येथे थुंकू नये’, अशा पाट्या ठिकठिकाणी दिसतात. पण अनेकदा या पाट्यांवरच गुटखा, पानमसाला खाऊन थुंकल्याचे चित्र पाहायला मिळते. कोणतेही सरकारी कार्यालय असो की बस, रेल्वे, स्थानके, दवाखाने, उद्याने, चित्रपटगृह, बहुतांश इमारतींच्या जिन्यांचे कोपरे रंगलेले दिसतात. त्यामुळे काही इमारतींमध्ये जिन्यांच्या कोपऱ्यांत देव-देवतांची छायाचित्र लावलेली दिसतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विविध आजार पसरतात. त्या ठिकाणाचे विद्रुपीकरण होते, दुर्गंधी पसरते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे किंवा थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार शासनाच्या विविध विभागांना आहेत. पण अपुऱ्या मनुष्यबळाअभावी अशी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे ही एक सामाजिक समस्या बनली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने थुंकण्याच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये महाविद्यालयीन युवकांना सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने केले आहे. आयोगाचे सचिव प्रो. रजनीश जैन यांनी देशभरातील सर्व विद्यापीठांना या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. कुठेही थुंकण्याचे प्रकार रोखण्यासाठी युवक लोकांमध्ये जनजागृती निर्माण करू शकतात. महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकही यामध्ये सहभागी होऊ शकतात. जनजागृती फेऱ्या , लोकशिक्षण, थुंकणेविरोधी मोहीम, थुंकणे व धुम्रपान तसेच त्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत जागृती अशा विविध माध्यमातून जनजागृती मोहिम राबवावी, असे आयोगाकडून विद्यापीठांना कळविण्यात आले आहे.

Web Title: Teachings of social welfare by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.