तनुश्री दत्ता उलगडणार #MeToo मोहिमेचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:38 AM2018-10-26T04:38:42+5:302018-10-26T13:28:07+5:30

देशात #MeToo चळवळ सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता शुक्रवारी ‘लोकमत वुमन समिट’मध्ये या चळवळीमागचा प्रवास उलगडणार आहे.

Tanushree Datta will unfold #MeToo campaign | तनुश्री दत्ता उलगडणार #MeToo मोहिमेचा प्रवास

तनुश्री दत्ता उलगडणार #MeToo मोहिमेचा प्रवास

Next

पुणे : देशात #MeToo चळवळ सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता शुक्रवारी ‘लोकमत वुमन समिट’मध्ये या चळवळीमागचा प्रवास उलगडणार आहे. तनुश्री प्रथमच जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहे. लोकमत वुमन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी होणार आहे. #MeToo#WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, युनिसेफ यांच्या सहयोगाने होणा-या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात महिलाशक्तीचे प्रतिनिधित्व करणाºया महिलांचा समावेश आहे. मादागास्करच्या राजदूत मेरी लिओन्टाइन रझानाद्रासोवा, सुधा वर्गिस, प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, पुरुष हक्क कार्यकर्त्या बरखा ट्रेहान सहभागी होणार आहेत. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी आहेत.
>उषा मडावी, मीनाक्षी देशपांडे यांचा होणार गौरव
वनसंपदेला वाचविण्यासाठी संघर्ष करणा-या ‘फॉरेस्ट वुमन’ उषा मेडावी यांना मातोश्री वीणा दर्डा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वत:च्या अपंगत्वावर मात करताना इतरही अपंग मुलींमध्ये जिद्दीचे बळ निर्माण करणाºया मीनाक्षी देशपांडे यांना सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केली.
>लोकमत सखी सन्मान राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण
लोकमतच्या वतीने राज्यपातळीवर लोकमत सखी सन्मान पुरस्कारांचे वितरणही या वेळी होणार आहे.
यंदाचे पुरस्कारार्थी असे : शैक्षणिक - मंजुश्री पाटील (मुंबई ), सांस्कृतिक - गौरी गाडगीळ (पुणे),
सामाजिक - डॉ. सुधा कांकरिया (अहमदनगर), क्रीडा - अंकिता गुंड (पुणे), व्यावसायिक - निराली जैन (नागपूर), शौर्य - जुलिअना लोहार (गोवा)

Web Title: Tanushree Datta will unfold #MeToo campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.