हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 03:13 PM2018-09-11T15:13:35+5:302018-09-11T15:28:59+5:30

येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे.

Talk on Horn ..... on concious about Horn pollution will be going through various initiatives in the city | हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर 

हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर 

Next
ठळक मुद्देप्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी नो हॉर्नवर प्रतिज्ञा तयारनो हॉर्नचा संदेश पोहचविण्यासाठी ही प्रतिज्ञा नो हॉर्न डे दिवशी अनेक शाळांमध्ये केली जाणार

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतुक पोलिसांच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून नो हॉर्न डे साजरा केला जाणार आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांचाही दि. १२ सप्टेंबर रोजी सक्रिय सहभाग असेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली. 
नो हॉर्न डे मोहिमेचा कृती आराखडा ठरविण्यासाठी सोमवारी (दि. १०) परिवहन कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीस विविध सासकीय विभागांचे अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, सेवा संस्थांचे पदाधिकारी, वाहतुकदार संघटना व मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे प्रतिनिधी उपस्थित होते. दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते नो हॉर्न डे ची सुरूवात केली जाईल. तसेच सकाळी १० वाजता एमआयटी संस्थेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता पिंपरी येथे विविध कार्यक्रम होतील. तसेच दोन्ही शहरांतील विविध चौकांमध्ये जनजागृती केली जाईल. नवचैतन्य हास्यपरिवार संस्थेतर्फे ६० पेट्रोल पंपांवर नो हॉर्नची पत्रके व स्टीकर्सचे वाटप केले जाईल. नागरिकांच्या हातात नो हॉनचा संदेश देणारी बँडही बांधली जातील. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नो हॉर्नची शपथही दिली जाणार असल्याचे आजरी यांनी सांगितले.
...............................
हॉर्नवर बोलू काही...
येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची... स्वत: देखील धोक्याची... सुज्ञपणाने वागुया... शांतीमय जग बनवुया अशी शब्दरचना असलेल्या जिंगलद्वारे प्रादेशिक परिवहन विभागाकडून नो हॉर्नबाबत जनजागृती केली जात आहे. प्रसिध्द कवी संदीप खरे यांची गीतरचना असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. दि. १२ सप्टेंबरपासून हॉर्नबाजी कायमची बंद करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन यात करण्यात आले आहे. 
-----------------
विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञा 
प्रादेशिक परिवहन विभागाने विद्यार्थ्यांसाठी नो हॉर्नवर प्रतिज्ञा तयार केली आहे. पुणे माझे शहर आहे माझ्या पर्यावरणाचे संवर्धन करणे माझे कर्तव्य आहे अशी प्रतिज्ञाची सुरूवात आहे. तर माझ्या पालकांनी हॉर्नचा वापर करू नये यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असा प्रतिज्ञेचा शेवट आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत नो हॉर्नचा संदेश पोहचविण्यासाठी ही प्रतिज्ञा नो हॉर्न डे दिवशी अनेक शाळांमध्ये केली जाणार आहे.

Web Title: Talk on Horn ..... on concious about Horn pollution will be going through various initiatives in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.