शहाण्या माणसांबद्दल बोलावे, नाना पटोलेंविषयी काय बोलणार? - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 06:28 PM2017-11-24T18:28:54+5:302017-11-24T18:29:22+5:30

देशातील उद्योगांची कौशल्य असलेली माणसे मिळत नाही अशी तक्रार आहे व दुसरीकडे रोजगार नाही असे वातावरण आहे. यात बदल व्हावा असे पवार म्हणाले.

Talk about the wise people, what will they say about the big gun? - Sharad Pawar | शहाण्या माणसांबद्दल बोलावे, नाना पटोलेंविषयी काय बोलणार? - शरद पवार

शहाण्या माणसांबद्दल बोलावे, नाना पटोलेंविषयी काय बोलणार? - शरद पवार

Next

पुणे : केंद्र सरकार, व त्यातही पंतप्रधान कौशल्य विकासाविषयी आग्रही दिसत आहेत. मात्र त्यांच्या योजना कृतीत यायला हव्यात अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.  देशातील उद्योगांची कौशल्य असलेली माणसे मिळत नाही अशी तक्रार आहे व दुसरीकडे रोजगार नाही असे वातावरण आहे. यात बदल व्हावा असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर लगेच आरडाओरडा सुरू करू नये, सरकारने थोडे नुकसान सोसावे. आपल्या एकूण खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांवर किती खर्च होतो याचा सरकारने विचार करावा असे पवार यांनी सांगितले. बीटी बियाणांवर पुन्हा संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आता अळी जास्त शक्तीमान झाली आहे, बियाणांमधील प्रतिबंधकांना दाद देत नाही असे त्यांनी सांगितलै. शहाण्या माणसांबद्दल बोलावे, नाना पटोलेंविषयी काय बोलणार? असे पवार म्हणाले. 

नाविन्यपुर्ण कल्पना व कौशल्याधारीत मनुष्यबळ या आघाडीवर देशात आज निराशेचे वातावरण आहे. यात बदल करायचा असेल तर देशभरातील शिक्षणसंस्थांनी एकत्र येउन प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकँडमीचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत सूतार . माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख मधुकर कोकाटे व अन्य पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, एक वेगळा उपक्रम हाती, कौशल्य विकास आणि विविध क्षेत्रात सेवा करण्याची दिवसागणिक हा प्रश्न जातील.
१९४७ मध्ये मुंबई रराज्य उंचच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ३० हजार आज ३० लाख आहे.  ४००० कॉलेजेस, त्यामधून ताठकातीक उच्च शिक्षण देण्याकगी सुविधा प्राप्त . काहीतरी करण्याचं उभारी कमी दिसते. एका बाजूला नैराश्य आणि दुसऱ्या बाजूला राज्य आणि देशातील जॉब मार्केटमध्ये मिस मॅच आवश्यक कौशल्ये असलेले लोक मिळत नाहीत, दुसरीकडे बेरोजगारी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शौक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.

कौशल्य विकासाची चर्चा, पंतप्रधानांनि भाषणात त्याचा उल्लेख केला. मंत्रालय लक्ष घालताना दिसत आहे. मात्र रेकॉर्ड बघितले आणि नॉलेज कमिशनच्या अहवाल बघितला तर फक्त ८ टक्के विद्यार्थी कौशल्य विकासात पारंगत. तर कोरियात ९२ टक्के विद्यार्थी पारंगत.
भारतात कौशल्य आहे, फक्त त्यांचा विस्तार झाला पाहिजे. झाला पाहिजे, महाराष्ट्रात मनःर जोशींचे सरकार असल्याने शक्य झाले नाही.
हुंडाईचा कारखाना चेन्नईला झाला. हजारो कॉलेज काढली, ज्ञान उपलब्ध केली, मात्र कौशल्य विकास विस्तार करून आत्मविश्वास असणारी पिढी निर्माण करण्यात अपयशी ठरलो आहोत. आज इनोवेशांचा विचार केला जात आहे, त्यात १२० देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यात भारताचे स्थान १०० वे. त्यात अधिक लक्ष दिल्याशिवाय गत्यंतर नाही. इनोव्हेशन संधी आणि ज्ञान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी, राजस्थान कोटा, त्याचा परिणाम - अन्य राज्यातील विद्यार्थी प्रधासकीय सेवेत दिसतात.

 

Web Title: Talk about the wise people, what will they say about the big gun? - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.