पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 09:45 AM2019-06-29T09:45:37+5:302019-06-29T09:57:05+5:30

पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली

Take a deeper inquiry into the accident in Pune; Order to the District Collector by CM | पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Next

मुंबई - पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून दुर्दैवी घटना घडली. यात 15 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेला जबाबदार कोण यावरुन प्रश्न निर्माण झालेला आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. 

कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून  झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला़ अग्निशामक दलाला ठिगाऱ्यांखालून  ३ जणांना जिवंत काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे.


आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. ४ फुट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजूरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करुन शोधकाम करण्यात येत होते.


वरुन पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली़ भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सर्व जण गाडले गेले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. 
घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली असून प्रथमदर्शनी या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचं दिसतंय मात्र या घटनेची संपूर्ण चौकशी करू असं सांगितले आहे. मृत मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारमधून आल्याचं सांगितलं जातं. पुण्यात सुरु असणाऱ्या पावसाने इमारतीजवळील जमीन भुसभूसीत झाली त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.


तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. तर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 



 

 

Web Title: Take a deeper inquiry into the accident in Pune; Order to the District Collector by CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.