Take action against Aarti Kondhre or will stop work ; warning by sasoon doctors | आरती काेंढरे यांच्यावर कारवाई करा अन्यथा काम थांबवू ; ससूनच्या डाॅक्टरांचा इशारा
आरती काेंढरे यांच्यावर कारवाई करा अन्यथा काम थांबवू ; ससूनच्या डाॅक्टरांचा इशारा

पुणे : नगरसेविका आरती काेंढरे यांच्यावर महिला डाॅक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना त्यांच्यावर डाॅक्टर प्राेटेक्शन कायद्यानुसार कारवाई न झाल्यास कामबंद ठेवणार असल्याचा इशारा मार्डच्या डाॅक्टरांनी दिला आहे. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र लिहीत हा इशारा देण्यात आला आहे. 

भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात ससूनच्या महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी  रात्री स्नेहल या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये रुग्णावर उपचार करत असताना कोंढरे यांनी तेथे येऊन  त्यांना तातडीने त्यांच्याशी संबंधीत रुग्णावर उपचार करण्यास सांगितले. त्यावर स्नेहल यांनी त्या रुग्णाच्या डोक्यात टाके घातले असून सी टी स्कॅनसाठी पाठवायचे आहे असे उत्तर दिले. यावर चिडलेल्या नगरसेविकेने तुझी तक्रार वरिष्ठांकडे करते सांगून मोबाईल कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉ. स्नेहल यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी दिली. दरम्यान कोंढरे यांचा मुलगा पृथ्वीराज सचिन कोंढरे यांच्याकडून झालेल्या अपघातामध्ये संबंधित रुग्ण जखमी झाला. 

काेंढरे यांना अटक न झाल्याने संतप्त झालेल्या मार्डच्या डाॅक्टरांनी ससूनच्या अधिष्ठातांना पत्र लिहीत काेंढरे यांना अटक न झाल्यास शुक्रवारी कामबंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. कारवाई हाेईपर्यंत सर्व ओपीडी बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवासी डाॅक्टरांकडून सांगण्यात आले आहे. 


Web Title: Take action against Aarti Kondhre or will stop work ; warning by sasoon doctors
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.