आळंदीकरांना दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच, महिन्यापासून गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 03:14 AM2017-12-31T03:14:28+5:302017-12-31T03:15:10+5:30

तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पिण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहरात नळाद्वारे वितरित होणाºया पाण्याची सध्या ‘रंगपंचमी’ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना रंगहीन अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

The supply of contaminated water to Alandi is in progress, inconvenience from month to month | आळंदीकरांना दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच, महिन्यापासून गैरसोय

आळंदीकरांना दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच, महिन्यापासून गैरसोय

Next

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पिण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहरात नळाद्वारे वितरित होणाºया पाण्याची सध्या ‘रंगपंचमी’ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना रंगहीन अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
आळंदी शहरातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून १० एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे शुक्रवारी (दि. २९) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते लोकार्पणही करण्यात आले; परंतु लोकार्पण केलेला हा जलशुद्धीकरण प्रकल्प आळंदीकरांना पूर्ण क्षमतेने शुद्ध पाणीपुरवठा वितरित करण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याची सत्यस्थिती समोर येत आहे.
एका महिन्यापासून आळंदी शहराला पाणीपुरवठा करणाºया नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे चालू महिन्यात दोन आठवड्यांहून अधिक काळ हा प्रकल्प सुरळीतपणे चालू नव्हता. जलशुद्धीकरण प्रकल्प कधी चालू होतो, तर कधीही बंद पडत आहे. चालू महिन्यात आळंदीकरांना वारंवार त्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे चालू महिन्यात शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये शनिवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात नळाद्वारे चक्क पिवळसर तसेच काळसर घाण पाणी आले होते. अस्वच्छ पाणी आळंदीकरांसाठी नित्याचा प्रश्न बनत चालल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली जाऊ लागली आहे. तर, सोशल मीडियावर अस्वच्छ पाण्यासंदर्भात पालिका प्रशासनावर ताशेरे ओढून संताप व्यक्त केला जात आहे.

अद्यापही शुद्ध पाणी नाही...

चालू महिन्यात नवीन जलशुद्धीकरण केंद्राची पंपिंग मशीनची यंत्रणा बिघडलेली होती. परिणामी, शहरात अपुरा पाणीपुरवठा होत होता. तर, काही भागात अशुद्ध पाणी वितरित होत होते.

मागील आठवड्यात शहरातील प्रभाग ४, २ व ९मधील नळांमधून काळसर रंगाचे पाणी येत होते. त्यानंतर खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद, शाखा अभियंता अजय भोसले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने, मुख्याधिकारी समीर भूमकर आदींनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली होती.
प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ उपाययोजना करून शहरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसºया दिवसापासून जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु, अजूनही शहराला अपेक्षित आहे तितक्या प्रमाणात पाण्याचे वितरण होत नाही.

जलशुद्धीकरण केंद्रात दारूच्या बाटल्या
नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण मंत्रिमहोदयांच्या हस्ते करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, सिद्धबेट येथील जलशुद्धीकरण केंद्राची मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात एरवी असलेली अस्वच्छता गायब झाली. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीत लोकार्पणाच्या दिवशीच दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. ‘जिथं गावचं पाणी स्वच्छ होतं, त्याच कक्षात दारूच्या बाटल्या कशा?’ असा प्रश्न शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

नवीन जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल.
- समीर भूमकर, मुख्याधिकारी
आळंदी नगर परिषद

Web Title: The supply of contaminated water to Alandi is in progress, inconvenience from month to month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी