पालकांनी मारहाण केल्याने मुख्याध्यापकाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:33 PM2018-12-15T15:33:00+5:302018-12-15T15:34:25+5:30

डोणजे भागातील एका शाळेत सर्वांसमोर घडलेल्या या घटनेमुळे व्यथित होऊन मुख्याध्यापकाने कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली.

suicide by headmasters due to due to Parents beaten | पालकांनी मारहाण केल्याने मुख्याध्यापकाने केली आत्महत्या

पालकांनी मारहाण केल्याने मुख्याध्यापकाने केली आत्महत्या

ठळक मुद्देतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल : मानसिक धक्क्यातून केले कृत्य 

पुणे : मुलीला शिक्षा केल्याने जाब विचारणाऱ्या पालकांनी शाळेत मारहाण केली़. डोणजे भागातील एका शाळेत सर्वांसमोर घडलेल्या या घटनेमुळे व्यथित होऊन मुख्याध्यापकाने कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली. २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणात मुख्याध्यापकांच्या पत्नीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अशोक कावरे (वय ५३, रा. रश्मी हाऊस, लगड मळा, वडगाव खुर्द, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. याप्रकरणी कावरे यांची पत्नी वर्षा कावरे (वय ४९) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्षा कावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ पारगे, पूजा पारगे, रोहिणी कुंभार, बाळासाहेब पारगे, सुवर्णा चव्हाण (सर्व रा. डोणजे गाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अशोक कावरे सिंहगड किल्लाच्या पायथ्यालगत असलेल्या डोणजे गावातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. या शाळेतील मुलीला २४ सप्टेंबर रोजी शिक्षा केली होती. मुलीने ही बाब  पालकांना सांगितली़ तेव्हा पालक पारगे, कुंभार, चव्हाण शाळेत आले. त्यांनी शाळेत सर्वांदेखत कावरे यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेमुळे इतकी वर्षे केलेल्या शिक्षकाच्या नोकरीवर धब्बा लागल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला़ अपमानित झालेल्या कावरे यांनी सिंहगड रस्ता भागातील कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली़. 
पतीच्या निधनानंतर आजारी पडल्याने त्यातून सावरल्यानंतर पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे वर्षा कावरे यांनी फिर्यादीत नमूद केले. कावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी तपास करत आहेत.

Web Title: suicide by headmasters due to due to Parents beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.