पुस्तकातले प्रयाेग प्रत्यक्ष करुन पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी ; पुणे विद्यापीठाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 08:14 PM2018-06-12T20:14:45+5:302018-06-12T20:14:45+5:30

शाळेत शिकवले जाणारे विज्ञानातील प्रयाेग प्रत्यक्षात करुन पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कतर्फे विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयाेगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात अाली अाहे.

students will get the chance to do science experiment; pune university initiative | पुस्तकातले प्रयाेग प्रत्यक्ष करुन पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी ; पुणे विद्यापीठाचा उपक्रम

पुस्तकातले प्रयाेग प्रत्यक्ष करुन पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी ; पुणे विद्यापीठाचा उपक्रम

googlenewsNext

पुणे :  विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिकवले जाणारे विज्ञानातील प्रयाेग हे प्रत्यक्षात करुन पाहण्याची संधी क्वचितच मिळत असते. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्यावतीने इयत्ता पाचवी अाणि सहावीच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार असून विद्यापीठात या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयाेगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात अाली अाहे. प्रयाेगशीलतेतून विज्ञान शिका अशी संकल्पना घेऊन सुरु हाेत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी दाेन स्वतंत्र गट असणार अाहेत. या अंतर्गत 20 सत्र असणार असून दर अाठवड्याला 2 तासाचे एक सत्र घेण्यात येणार असल्याची माहिती सायन्स पार्क विभागाच्या वतीने देण्यात अाली अाहे. 


    विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिकवले जाणारे विज्ञान हे प्रत्यक्ष प्रयाेग करुन बघण्याची संधी मिळणार असून त्यांना विज्ञान चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत हाेणार अाहे. या नव्या गटांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयाेगशाळेत अनेक नवीन प्रयाेग स्वतः करायला मिळतील, तसेच त्यांच्या मनातील शंका अाणि विविध प्रश्न विचारुन तज्ज्ञांसाेबत चर्चादेखील करता येणार अाहे. शाळेच्या वेळेनुसार तसेच परीक्षेच्या वेळापत्रकानुसार या दाेन्ही बॅचच्या वेळा ठरविण्यात येणार अाहेत. 15 जुलै 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत हे सत्र सुरु राहणार अाहेत. मराठी अाणि इंग्रजी भाषेत सुरु राहणाऱ्या अभ्यासक्रमात शालेय अभ्यासक्रमाचा विचार करण्यात अाला अाहे. 


    विद्यापीठाच्या सायन्स पार्कमध्ये मांडण्यात अालेल्या प्रयाेगशाळेत 500 हून अधिक वैज्ञानिक प्रयाेग, लहान माेठी उपकरणे व संच उपलब्ध अाहेत. या 20 सत्रांकरिता विद्यापीठाकडून प्रवेश शुल्क अाकारण्यात येणार अाहे. विद्यार्थ्यांना 18 जून 2018 पर्यंत नावनाेंदणी करता येणार अाहे. अधिक माहिती http://sciencepark.unipune.ac.in/events/
या लिंकवर उपलब्ध अाहे.

Web Title: students will get the chance to do science experiment; pune university initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.