विद्यार्थ्यांना मिळणार पृथ्वीवरील कुठलाही फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 01:28 PM2019-04-11T13:28:19+5:302019-04-11T13:36:36+5:30

येत्या १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना यात भाग घेऊन पृथ्वीवरील कुठलेही छायाचित्र ' नासा ' कडून मिळवता येत आहे. 

Students will get any photos on earth | विद्यार्थ्यांना मिळणार पृथ्वीवरील कुठलाही फोटो 

विद्यार्थ्यांना मिळणार पृथ्वीवरील कुठलाही फोटो 

Next
ठळक मुद्देनासाकडून खास उपक्रम : १२ एप्रिलपर्यंत सहभागी होता येणार विद्यार्थ्यांना पृथ्वीवरील हवे ते छायाचित्र मिळणार अर्थकॅम मिशनचे सेंटर अमेरिकेतून नियंत्रित करण्यात येते.

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीबाबत आणि अवकाशाबाबत गोडी निर्माण व्हावी,  पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे चित्र पाहता यावे आणि ते मिळवता यावे, यासाठी नासा संस्थेतर्फे सॅली राइड एर्थकॅम(’edge Acquired by ddMÑ’e schoo’ stude)  नावाचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येते. येत्या १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना यात भाग घेऊन पृथ्वीवरील कुठलेही छायाचित्र ' नासा ' कडून मिळवता येत आहे. 
' नासा ' संस्थेकडून विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांना पृथ्वीबाबतचे ज्ञान व्हावे यासाठी विविध उपक्रम सुरू केल्याची माहिती न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडमधील तारांगण चे प्रमुख आणि खगोल अभ्यासक प्रा. व्ही. व्ही. रामदासी यांनी दिली. न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन पृथ्वीवरील छायाचित्रासाठी अर्ज भरले आहेत.  
 याउपक्रमातंर्गत RiYEÔrthKAMX Zissio.मधून विद्यार्थ्यांना पृथ्वीवरील हवे ते छायाचित्र मिळणार आहे. या छायाचित्रांवरून विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, भौगोलिक, मॅथीमॅटिक्सचा अभ्यास करता येणार आहे. हा प्रकल्प डॉ. सॅली राइड यांनी सुरू केला. त्या अवकाशात जाणाऱ्या अमेरिकेतील पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. सॅली राइड या स्पेसमध्ये जाणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या. त्यांनी स्पेसमधून पृथ्वी पाहिली आणि त्यांना पृथ्वीचे सुंदर रूप दिसले. ही सुंदरता इतरांनी पाहावी आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांच्या नावाने इंटरनॅशनल स्पेस सेंटरने कॅमेरा लावला आहे.  

येथे करा नोंदणी   
अर्थकॅम मिशनचे सेंटर अमेरिकेतून नियंत्रित करण्यात येते. या अर्थकॅम प्रकल्पात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.eÔrth‘ZÔ.org/register..या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे. यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

   चार दिवस फोटोसाठी ऑरर्बिट उपलब्ध 
विद्यार्थ्यांनी एर्थकॅम या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करायची आहे. त्यात लॉगिन पासवर्ड मिळतो. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनचे छायाचित्र हवे त्याची माहिती अपलोड करणे आवश्यक असते. चार ऑरर्बिटची (कक्ष) नावे संकेतस्थळावर असतात. ते निवडून त्या ऑरर्बिट ज्या ठिकाणाहून जाणार असतील, त्याच्या परिसरातील कोणतेही ठिकाणाचे छायाचित्र तुम्हाला मिळू शकते. ९ ते १२ एप्रिल दरम्यान हे ऑरर्बिट उपलब्ध असतील. जे लोकेशन निवडले आहे, तिथले हवामान अगोदर तपासले पाहिजे. कारण ढगाळ वातावरण असेल, तर छायाचित्र मिळत नाही.

-----------------------------------------------------------
इंटरनँशनल स्पेस सेंटरमध्ये सहा खगोलशास्त्रज्ञ कार्यरत आहेत. ते या प्रोग्रँमवर लक्ष ठेवून असतात. या स्पेस सेंटरमध्ये कँमेरा लावलेला आहे. हे सेंटर पृथ्वीभोवती फिरत असते. 90 मिनिटात पृथ्वीची एक प्रदक्षिणा हे सेंटर पूर्ण करते. हे सेंटर आपल्या महाराष्ट्रावरून जात आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी सह्याद्रीचा फोटो मागविला आहे. तसेच गंगा नदी, अमेरिकेत एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्याचा फोटो मागविला आहे. हे फोटो स्पेस सेंटर संबंधित ठिकाणाच्या वरून गेले की, फोटो काढते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते. 
- व्ही. व्ही. रामदासी, खगोलतज्ज्ञ आणि तारांगण प्रमुख, 
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड 

Web Title: Students will get any photos on earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.