विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी : योगेश कुलकर्णी; पुण्यात शाळांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:23 PM2018-02-09T18:23:35+5:302018-02-09T18:28:57+5:30

केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापनेच्या दृष्टीने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Students should study science: Yogesh Kulkarni; School fair in Pune | विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी : योगेश कुलकर्णी; पुण्यात शाळांचा मेळावा

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी : योगेश कुलकर्णी; पुण्यात शाळांचा मेळावा

Next
ठळक मुद्दे डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे शाळांचा मेळावाकेंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत उपक्रम

पुणे : ‘शालेय मुलांची विज्ञानाबद्दलची समज लक्षात घेता त्यांना विज्ञानाच्या माध्यमातून एकदम मोठ्या समस्यांवर उत्तरे शोधता येतील, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. छोट्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी विज्ञानाची कोणती तत्त्वे उपयुक्त ठरतील यासाठी धडपड करणे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. कोणता विज्ञान प्रकल्प हाती घ्यायचा हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न सांगता त्यांना स्वत: ला जाणवणारे छोटे प्रश्न सोडवण्यापासून सुरूवात करू द्यावी’, असे मत पाबळ येथील विज्ञान आश्रमाचे कार्यकारी संचालक योगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापनेच्या दृष्टीने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलकर्णी बोलत होते. मुख्याध्यापिका पल्लवी नाईक, कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, अहमदाबाद येथील बेस्ट हायस्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख मदीश पारीख, क्रिस बॅस्टिअन पिल्लई, अक्षय चावला या वेळी उपस्थित होते.

Web Title: Students should study science: Yogesh Kulkarni; School fair in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.