‘वाणिज्य’साठी चुरस, कला इंग्रजीकडेही ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:10 PM2018-07-06T22:10:42+5:302018-07-06T22:22:20+5:30

सुमारे ३८ हजार ६०० जागांसाठी तब्बल ३६ हजार अर्ज आल्याने वाणिज्यला प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळेल.

student interst in commerce even art and English | ‘वाणिज्य’साठी चुरस, कला इंग्रजीकडेही ओढा

‘वाणिज्य’साठी चुरस, कला इंग्रजीकडेही ओढा

Next
ठळक मुद्देअकरावी प्रवेश : कटआॅफमध्ये विज्ञान ‘टॉप’पहिल्या फेरीत विज्ञान शाखेचे खुल्या गटाचे कटआॅफ गुण सर्वाधिक ४८८ पर्यंत कला मराठीच्या एकुण ८०६० जागांसाठी ४६९६ तर इंग्रजीच्या ५९४० जागांसाठी २३३७ एवढेच अर्जयंदाही कला इंग्रजी व मराठी माध्यमाच्या जागा निम्म्याहून अधिक रिक्त राहणार

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा वाणिज्य शाखेमध्ये प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. सुमारे ३८ हजार ६०० जागांसाठी तब्बल ३६ हजार अर्ज आल्याने वाणिज्यला प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळेल. तुलनेने विज्ञान शाखेसाठी कमी अर्ज आले आहेत. मात्र, असे असले तरी पहिल्या फेरीत विज्ञान शाखेचे खुल्या गटाचे कटआॅफ गुण सर्वाधिक ४८८ पर्यंत पोहचले आहेत. विशेष म्हणजे कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाचे कटआॅफही ४८४ पर्यंत गेले. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी कला इंग्रजीला पसंती देत असल्याचे दिसते. 
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी व कट आॅफ गुरूवारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दि. ६ जुलैपासून संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुरूवात केली आहे. एकुण ७५ हजार ९३९ अर्जांपैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत प्रवेशासाठी पसंती क्रमानुसार निवड झाली आहे. या फेरीमध्ये शहरातील नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ असल्याचे कटआॅफवरून दिसून येते. कटआॅफ विज्ञान शाखेचे कटआॅफ सर्वाधिक ४८८ एवढे असून वाणिज्य शाखेचे कटआॅफ ४७५ एवढे आहे. विज्ञानच्या तुलनेत वाणिज्यचा कटआॅफ कमी असला तरी अर्ज अधिक आल्याने प्रवेश सहजासहजी मिळणार नाही. पहिल्या फेरीत वाणिज्यसाठी सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अद्याप तेवढ्याच जागा शिल्लक असल्याने पुढील फेºयांमध्येही चुरस पाहायला मिळेल.
यंदा कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाला विद्यार्थ्यांंनी पसंती दिल्याचे दिसते. विज्ञान शाखा व कला इंग्रजीचे कटआॅफ जवळपास असून वाणिज्यला मागे टाकले आहे. मागील काही वर्षांपासून कला इंग्रजी शाखेडील कला वाढत चालला आहे. स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देणारे विद्यार्थी कला इंग्रजी शाखेत प्रवेश घेत आहेत. कला इंग्रजीच्या जागा सुमारे सहा हजार असल्या तरी अर्ज केवळ २ हजार ३३७ एवढेच आले आहेत. पण तरीही कटआॅफ अधिक लागल्याने चांगले गुण मिळालेले विद्यार्थी वाणिज्य व विज्ञान शाखेबरोबरच कला शाखेलाही पसंती देत असल्याचे दिसते. 
------------------------
शाखा-माध्यमनिहाय प्रवेश क्षमता व अर्ज 
शाखा        कला        वाणिज्य        विज्ञान
माध्यम    मराठी    इंग्रजी    मराठी    इंग्रजी    इंग्रजी
प्रवेश क्षमता    ८०६०    ५९४०    १४०००    २५५६०    ३९०९०
अर्ज        ४६९६    २३३७    ११६४१    २४३१५    ३२७५९
----------------    

वाणिज्य शाखेचे टॉप टेन कटआॅफ गुण (खुला गट) -
महाविद्यालय       कटआॅफ
बीएमसीसी        ४७५
गरवारे        ४६७
सिम्बायोसिस        ४६३
अमृता         ४६१
एमआयटी        ४५८
सेंट उर्सुला        ४५७
सर परशुरामभाऊ    ४५५
विमलबाई गरवारे    ४५४
एस. एम. चोक्सी    ४५३
मॉडर्न         ४५१
----------------------------
विज्ञान शाखेचे टॉप टेन कटआॅफ गुण (खुला गट) -
महाविद्यालय        कटआॅफ
बालवडकर         ४८८
लक्ष्मणराव आपटे    ४८८
श्री हरिभाऊ गिरमे    ४८३
फर्ग्युसन        ४८२
पी. बी. जोग        ४७९
पी. जोग        ४७७
डॉ. कलमाडी शामराव    ४७५
मॉडर्न            ४७२
एचएचसीपी        ४७२
सिटी प्राईड        ४७२
--------------------------------
कला शाखेचे टॉप टेन कटआॅफ गुण (खुला गट) -
महाविद्यालय        कटआॅफ
फर्ग्युसन         ४८४
सिम्बायोसिस         ४७५
सर परशुरामभाऊ     ४७२
मॉडर्न            ४६८
नौरोसजी वाडिया    ४५३
सेंट मिराज        ४५२
पी. जोग        ४५१
फर्ग्युसन (मराठी)    ४२३
डॉ. डी. वाय. पाटील    ४०३
आबेदा इनामदार        ३९७    
..................
यंदाही ‘कले’ची बाकडे रिकामी
एकीकडे कला इंगजीचे कटआॅफ विज्ञानाशी स्पर्धा करत असले तरी उपलब्ध जागा व अर्जांमध्ये जवळपास निम्मा फरक आहे. त्यामुळे यंदाही कला इंग्रजी व मराठी माध्यमाच्या जागा निम्म्याहून अधिक रिक्त राहणार आहेत. कला मराठीच्या एकुण ८०६० जागांसाठी ४६९६ तर इंग्रजीच्या ५९४० जागांसाठी २३३७ एवढेच अर्ज प्राप्त झाले आहेत.

        

Web Title: student interst in commerce even art and English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.