बारामती शहरावर आता राहणार सीसीटीव्हीची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 01:30 PM2019-06-01T13:30:21+5:302019-06-01T13:38:51+5:30

महाविद्यालय परिसरातील विद्याथिर्नी, महिलांसोबत होणारे छेडछाडीचे प्रकार रोखणे, महिलांची सुरक्षा यासाठी सीसीटीव्ही महत्वाचे आहेत.

strictly watch by CCTV camera on Baramati city | बारामती शहरावर आता राहणार सीसीटीव्हीची करडी नजर

बारामती शहरावर आता राहणार सीसीटीव्हीची करडी नजर

Next
ठळक मुद्दे१७२ कॅ मेऱ्यांसाठी १ कोटी ३४ लाखांच्या प्रकल्पाला मंजुरी : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल

बारामती : शहर आणि परिसरात १७२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी १ कोटी ३४ लाख ३० हजार ८०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण बारामती शहरावर कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. शहरातील नागरिकांच्या प्रभावी सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
नगरपरिषद हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती सीसीटीव्हीमध्ये जतन करणे शक्य होईल. शिवाय गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठी मदत होईल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या सुरक्षिततेसाठी या प्रकल्पाबाबत आग्रही होते. त्यांनी पुढाकार घेउन याबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार कॅ मेरे बसविण्याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रकल्पासाठी १ कोटी ३४ लाख ३० हजार ८०० रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ७५ लाखांची रक्कम खासदार डी पी. त्रिपाठी यांच्या निधीतुन, तर ५९ लाख ३० हजार ८०० रुपयांची रक्कम बारामती नगरपरीषदेकडुन उपलब्ध होणार आहे. निविदा प्रक्रियेबाबत पोलीस अधिक्षकांनी कार्यवाही करण्यासाठी गृह विभागाने आदेश दिले आहेत. 
याबाबत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की,  बारामती शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झालेला हा  अत्यंत महत्वपुर्ण निर्णय आहे. खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्या खासदार निधीतुन पैसे उपलब्ध होणार आहेत. 
बारामती शहराची लोकसंख्या मोठी आहे.तसेच कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहराचा परिपुर्ण सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानंतरच शहरातील महत्वाचे ‘लोकेशन’ ‘फायनल’ करण्यात आले. या लोकेशन च्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यानंतर बहुतांश शहरावर कॅ मेऱ्याची नजर राहणार आहे. महाविद्यालय परिसरातील विद्याथिर्नींचे होणारे छेडछाडीचे प्रकार रोखणे, महिलांची सुरक्षा या साठी सीसीटीव्ही महत्वाचे आहेत. शिवाय शहरात बिघडलेला ‘ट्राफिक सेन्स’ या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सुधारण्यास चांगलीच मदत होइल. शिवाय शहरातील रस्त्यांवरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर जरब बसेल. अपघातांचे प्रमाण कमी होईल. शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्हीमुळे दुचाकीचोर सहजपणे अशा चोऱ्या करण्यास धजावणार नाहीत.बारामती शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. 
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहराच्या हद्दवाढीसह १७२ सीसीटीव्ही  कॅ मेºयाचा प्रस्ताव केला होता. यासाठी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाहणी करण्यात आली. हद्दवाढीत दोन पोलीस ठाण्याचा सहभाग आहे.यामध्ये सगळे चौक,शहराकडे येणारे रस्ते,धार्मिक स्थळ,संवेदनशील भाग, सोन्याचे दागिने चोरण्याचे प्रकार होतात.त्या जागा लक्षात घेवुन विविध ठीकाणी कॅ मेरे बसविण्यात येणार आहेत. यामध्ये ३५ कॅ मेरे ‘मुव्हेबल’ आहेत. ते विविध अँगलमध्ये फिरुन चित्रीकरण करतील. या कॅ मेऱ्याचे ३० दिवसांचे रेकॉर्डिंग राहणार असुन ते सर्व ‘वायरलेस’ आहेत. यासाठी दोन टॉवर उभे केले जाणार आहेत. 
.....
सीसीटीव्ही यंत्रणेचे तीन युनिट असणार आहेत. तीन ठिकाणावरुन सीसीटीव्ही कॅ मेºयाचे नियंत्रण केले जाणार आहे. त्यासाठी बारामती नगरपरिषद कार्यालय, शहर पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे या तीन ठिकाणाहुन कॅ मेऱ्याचे नियंत्रण केले जाणार आहे.शहरातील आठ चौकामध्ये आठ बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याची चित्रीकरणाची क्षमता एक ते दोन किमी आहे. हे कॅमेरे ‘डे नाईट‘ प्रकारातील असल्याने दिवसा आणि रात्री देखील प्रभावीपणे चित्रीकरण करणे शक्य होईल.  कॅमेऱ्यामुळे चोऱ्यांवर प्रतिबंध होईल. रस्त्यांवर हुल्लडबाजी करणारांवर नियंत्रण आपोआप येईल.  बेशिस्त वाहनचालक,भरधाव वेगाने जाणारे वाहनचालक, नो पार्किंगमध्ये वाहने लावणारे वाहनचालक आदींवर कठोर कारवाई करणे आता शक्य होईल. बेशिस्त वाहनचालकांची छायाचित्र सीसीटीव्ही कॅ मेऱ्यात कैद होतील. ती छायाचित्र उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. त्या वाहनांवर कारवाई करणे सोपे जाईल, त्यांच्याकडुन दंड देखील वसुल केला जाईल. परिणामी बेशिस्त वाहतुकीला चाप बसेल. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी हे सीसीटीव्हीचे बुलेट कॅमेरे बसविण्यासाठी टेंडर काढुन निविदा काढण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जलदगतीने ही प्रक्रिया पार पाडणार असल्याने लवकरच शहर सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविलेले दिसतील.  - नारायण शिरगांवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी 

Web Title: strictly watch by CCTV camera on Baramati city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.