शहरामध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 04:07 AM2018-01-03T04:07:00+5:302018-01-03T04:07:02+5:30

कोरेगाव भीमा परिसरात सोमवारी दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तणावपूर्ण शांतता होती़ हडपसर, पिंपरी भागात ८ बस व अन्य वाहनांवर दगडफेक करून काचा फोडण्याच्या घटना घडल्या असून शहरात राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, शीघ्र कृतीदल तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली़

 Stressful calm in the city, police tightening | शहरामध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

शहरामध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Next

पुणे - कोरेगाव भीमा परिसरात सोमवारी दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तणावपूर्ण शांतता होती़ हडपसर, पिंपरी भागात ८ बस व अन्य वाहनांवर दगडफेक करून काचा फोडण्याच्या घटना घडल्या असून शहरात राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, शीघ्र कृतीदल तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली़
कोरेगाव भीमा येथे झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासूनच शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़ हडपसर भागातील भेकराईनगर येथे सकाळी पीएमपी व एसटी बसवर दगडफेक करण्यात आली़ त्यानंतर या भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली़ विश्रांतवाडी भागातील मुख्य चौकात दुपारी कार्यकर्ते जमले होते़ कार्यकर्त्यांकडून कोरेगाव भीमा येथील घटनेचा तीव्र निषेध करत पोलिसांना निवेदन देण्यात आले़ काही ठिकाणी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न झाला़
याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले, की शहरात अनेक ठिकाणी गटागटांनी येऊन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़ पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर ते निघून गेले़ शहरात राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, जलद कृती दल यांच्याबरोबरच शहरातील सर्व पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे़ प्रत्येक विभागात पोलीस उपायुक्त स्वत: बंदोबस्तावर लक्ष ठेवून असून सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत़
दलित आणि मराठा समाजातील नेत्यांची दुपारी बैठक घेण्यात आली असून शहरात शांतता राखण्याचे आवाहनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़
मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह इतरांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपासासाठी तो शिक्रापूर पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे़ मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध १९९० पासून आतापर्यंत संपूर्ण राज्यात एकूण ३६ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे़ त्यातील बहुतांश हे बेकायदेशीर जमाव जमवून प्रतिबंधात्मक आदेश भंग केल्याचे गुन्हे असल्याचे शुक्ला यांनी सांगितले़
कोरेगाव भीमातील सोमवारच्या घटनेनंतर मंगळवारी शहरात सर्वत्र तणाव दिसून येत होता़ शहराच्या विविध भागात अनुचित प्रकार घडल्याचे बोलले जात होते़ त्याची खात्री करून घेण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षातील फोन तातडीने खणखणत होते़ एखादी माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून तातडीने त्या ठिकाणी पोलिसांना पाठविले जात होते़ परंतु, अनेकदा केवळ त्या अफवाच असल्याचे दिसून आले़ अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना घरी लवकर जाण्याची परवानगी दिली़

अफवांवर विश्वास ठेवू नका
समाज माध्यमातून प्रक्षोभक संदेश प्रसारित करणाºयांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ या संदेशावर सायबर सेलकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे़ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये़ काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाची संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे़

Web Title:  Stressful calm in the city, police tightening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.