पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:33 PM2018-01-02T16:33:47+5:302018-01-02T16:35:09+5:30

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील पीएमआरडीएचा दुसरा मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. 

State Cabinet approval for PMRDA's Hinjewadi to Shivaji nagar Metro project | पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देपीएमआरडीएकडून मेट्रोसाठी ६ हजार ४०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादरपुणे महानगरपालिकेच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांस झाली सुरूवात

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील पीएमआरडीएचा दुसरा मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. 
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पीएमआरडीए मार्फत अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली, या वृत्तास पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी दुजोरा दिला आहे. 
पीएमआयडीएच्या मेट्रो प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २० टक्के निधी मिळणार असून उर्वरित ६० टक्के निधी खासगी उद्योजकांच्या सहभागातून उभा केला जाणार आहे. पीएमआरडीएकडून मेट्रोसाठी ६ हजार ४०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांस सुरूवात झाली आहे.मात्र, पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्प राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत होता.परंतु, त्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पीपीपी तत्त्वारील मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे लवकरच शहरात दोन मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू झालेली दिसतील, असे मेट्रो प्रकलपाशी निगडीत अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

Web Title: State Cabinet approval for PMRDA's Hinjewadi to Shivaji nagar Metro project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.