राज्य प्राणी ‘शेकरु’ची पुण्यात वंशवृद्धी, कात्रज प्राणीसंग्रहालयाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:33 AM2019-05-14T05:33:51+5:302019-05-14T05:34:06+5:30

महापालिकेच्या या संग्रहालयात एक नर आणि दोन मादी शेकरु एक-दीड वर्षांपासून आणून प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरु आहेत.

State animal 'Shekharu' in Pune, a propagation of the Katraj Zoo Museum | राज्य प्राणी ‘शेकरु’ची पुण्यात वंशवृद्धी, कात्रज प्राणीसंग्रहालयाचा उपक्रम

राज्य प्राणी ‘शेकरु’ची पुण्यात वंशवृद्धी, कात्रज प्राणीसंग्रहालयाचा उपक्रम

googlenewsNext

- सुषमा शिंदे-नेहरकर

पुणे : महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु (जायंट स्क्विरल) नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच शेकरु च्या संरक्षण व संवर्धनासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मदतीने पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात ‘शेकरु’चे प्रजनन केंद्र (ब्रिडींग सेंटर) सुरु करण्यात आले आहे. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर त्याचे उद्घाटन होणार आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले की, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानाने ‘वन्य प्राण्याच्या राष्ट्रीय प्रजनन कार्यक्रम’ अंतर्गत देशभरतील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ७२ वन्य प्राण्यांच्या वंश संवर्धनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील विविध प्राणी संग्रहालयांना वेगवेगळ््या वन्य प्राण्याचे ब्रिडींग सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
यानुसार महाराष्ट्रात पुणे महापालिकेला ‘शेकरु’चे प्रजनन केंद्र सुरु करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या या संग्रहालयात एक नर आणि दोन मादी शेकरु एक-दीड वर्षांपासून आणून प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरु आहेत.

कठीण चाचणी यशस्वी
शेकरुचा ब्रिडींगची अत्यंत कठीण चाचणी यशस्वी झाली असून, आता अधिकृतपणे हे सेंटर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तेवढा निधी व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अन्य वन्यप्राण्यांसाठी देखील हा विचार सुरु आहे.
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त

Web Title: State animal 'Shekharu' in Pune, a propagation of the Katraj Zoo Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे