जवानांच्या कुटुंबामागे खंबीरपणे उभे राहावे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 12:50 AM2019-02-17T00:50:09+5:302019-02-17T00:50:38+5:30

वीरपत्नी दीपाली मोरे : पुलवामा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ मूकमोर्चा

Stand firm behind the soldiers of the soldiers | जवानांच्या कुटुंबामागे खंबीरपणे उभे राहावे

जवानांच्या कुटुंबामागे खंबीरपणे उभे राहावे

Next

पुणे : माझ्या पतीला २००४ मध्ये काश्मीरमध्ये वीरमरण प्राप्त झाले. ज्या सैनिकाने देशवासीयांच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावलेली असते, त्याच्या परिवाराला सरकारी आणि खासगी मदत मिळते. परंतु, त्यापलीकडे जाऊन सैनिकाच्या बलिदानानंतर त्यांच्या परिवाराच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा वीरपत्नी दीपाली मोरे यांनी व्यक्त केली.

पीयूष मिश्रांकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली

पुणे स्मार्ट वीकमधील कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : ‘जब शहर हमारा सोता है...’, ‘एक बगल में चाँद होगा...‘हम कहेंगे अमन, हम कहेंगे मोहब्बत... ‘न ही सुनाओ लहू की कथा, मोहब्बत मोहब्बत की बाते करो’ अशा गीतांतून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना ‘सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ असे म्हणत पीयूष मिश्रा यांनी दहशतवादी कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानला सुनावले. ‘तसेच, रसिकांकडून येणाºया खास फर्माईशीनुसार काही गाणी पीयूष मिश्रा यांनी गायली. मात्र, त्यांचं स्वत:चं सर्वांत आवडतं एक गाणं मात्र रसिकांनी वारंवार फर्माईश करूनही गाण्याचा मोह आवरत ते गाणं गाण्याचे टाळले.

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यातील हुतात्म्यांना खºया अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी पीयूष मिश्रा यांचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीयूष मिश्रा यांनी एक प्रकारे यातून आम्हा पुणेकरांच्या भावना व्यक्त करीत आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली, असे पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.


‘कहते हैं जिसको दूजा मुल्क उस पाकिस्ताँ में पहुंचे, लिखता हूँ खत मैं हिंदोस्ताँ से, पहलू-ए हुसना पहुंचे, ओ हुसना...’ दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तान जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत हे गाणं गाणार नसल्याचं पीयूष मिश्रा यांनी सांगितलं.

Web Title: Stand firm behind the soldiers of the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे