कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 06:34 PM2018-11-30T18:34:05+5:302018-11-30T18:47:53+5:30

देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास...

Spectacular and disciplined movement in cold weather by students | कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन

( फोटो- कपिल पवार )

googlenewsNext
ठळक मुद्देएनडीएचा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळासुखोई तसेच जग्वार या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी विशेष आकर्षण जॅग्वार, सुखोई ठरले सोहळ्याचे आकर्षण

पुणे : तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास...अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा शुक्रवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला. अतिशय कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. 
या वेळी अधिकारी व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुखोई तसेच जग्वार या लढाऊ विमानांनी अधिकारी आणि उपस्थितांना दिलेली सलामी विशेष आकर्षण ठरले. 


भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत  या सोहळळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी  दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. या वेळी प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपीन,  डेप्युटी कमांडंट रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल तसेच लष्करातील उच्चपदस्त अधिकारी आणि छात्रांचे पालक या सोहळळ्यासाठी उपस्थित होते. 
 संचलनात एकुण २६१ कॅडेट सहभागी झाले होते. यातील १८६ छात्र लष्कराचे, २१ छात्र नौदलाचे आणि ५४ छात्र ह वाईदलातील होते. याशिवाय, अफगाणिस्तान, भूटान, किरगिझस्तान, लेसोवो, टान्झानिया, ताजिकिस्तान, मॉरिशस, व्हियतनाम आणि श्रीलंका या मित्रदेशातील १६ छात्रांचाही समावेश होता. 

यावर्षी तिन्ही दलातून उष्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जसप्रित सिंग या कॅडेटला राष्ट्रपती सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. अ‍ॅकॅडमी कॅडेट परिमल पराशरला राष्ट्रपती रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले. तर स्कॉडर्न कॅडेट कॅप्टन स्वप्निल गुप्ता याला राष्ट्रपती कांस्य पदकाने गौरविण्यात आले.   यावर्षी ‘ द चिफ आॅफ स्टाफ बॅनर’ चॅम्पीयन चार्ली स्कॉडर्न ने पटकावीला. 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना लष्करप्रमुख रावत म्हणाले,  देशातील सर्वात नोबल प्रोफेशन मध्ये तुम्ही आला आहात. तुमच्या खांद्यावरील तारे तुमच्या कार्याची जाणीव तुम्हाला देत राहिल. तीन वर्षात तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणामुळे साहस, नेतृत्वगुण आणि मुल्य तुम्ही शिकला आहात. तुम्ही मिळवले प्राविण्य भविष्यात प्रत्येक आघाडीवर तुम्हाला सक्षम आणि यशस्वी बनवेल.  
 .....................
जॅग्वार, सुखोई ३० विमानांनी विद्यार्थ्यांना दिली मानवंदना
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ वा दिक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. भविष्यातील तिन्ही दलातील 

( फोटो- कपिल पवार )

Web Title: Spectacular and disciplined movement in cold weather by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.