केंद्रीय समितीची पाठ फिरताच कच-याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:19 AM2018-02-20T07:19:40+5:302018-02-20T07:19:47+5:30

पुणे शहराचे क्रमांक पटकाविण्याचे स्वप्न राहणार?

As soon as the central committee follows, the pile of debris | केंद्रीय समितीची पाठ फिरताच कच-याचे ढीग

केंद्रीय समितीची पाठ फिरताच कच-याचे ढीग

Next

पुणे : शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, राडारोडा, कचरा उचलण्यापासून रस्त्यावरील भिकाºयांनादेखील नाईट शल्टरमध्ये हलविण्यासाठी स्वत: महापौरांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी, ‘स्वच्छ’चे कर्मचारी झपाटून कामाला लागले होते. यामुळे किमान एक महिनाभर पुणेकरांना स्वच्छ शहराची अनुभूती घेता आली. परंतु केंद्राच्या समितीकडून पाहणी करून जाताच शहरात अनेक ठिकाणी कचºयांचे ढीग दिसू लागले आहेत. शहरात प्रामुख्याने उपनगरांमध्ये रस्त्या-रस्त्यांवर कचरा पडला असून, शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक कोपºयांवर कचरा भरून ठेवलेल्या पिशव्या पडल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत असल्याचे ‘लोकमत’ पाहणीमध्ये स्पष्ट झाले.

पुणे शहराचे क्रमांक पटकाविण्याचे स्वप्न राहणार?
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील स्वच्छ शहर मोहिमेत स्वतंत्र ‘स्वच्छता अ‍ॅप’ विकसित केले आहे. या अ‍ॅपला नागरिकांचा मिळणार प्रतिसाद, नागरिकांच्या तक्रारींवर महापालिकेने केलेली कार्यवाही, नागरिकांचा सहभाग आणि प्रतिसाद या संदर्भात केंद्र शासनाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात पुणे शहराचा क्रमांक थेट वीस वर गेला होता. त्यानंतर महापालिका पदाधिकारी व प्रशासन खडबडून जागे झाले. जास्तीत जास्त पुणेकरांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी व त्यावर तक्रारी करण्यासाठी विविध पातळ््यावर प्रयत्न करण्यात आले. पुणे शहराचा किमान पहिल्या पाच मध्ये क्रमांक पटकवावा यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी स्वत: सर्व प्रमुख अधिकाºयांची बैठक घेतली. यात शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, राडारोडा टाकणारे, पानटपरी, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा. पुणे शहरात रस्ते, पदपथाची काम केल्यानंतर जागोजागी पडलेला राडारोडा, ब्लॉक्स, मातीचे ढीग त्वरित उचला, अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, लावणाºयांविरुद्धात खटले दाखल करा, टपरी, पानपट्टी- वाल्यांनी कचरा टाकण्यासाठी बिन्स ठेवले नसल्यास कडक कारवाई करा, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीविक्रेते कचरा टाकत असतील तर त्यांचे परवाने रद्द करा, भिकाºयांना नाईट शेल्टरमध्ये हलवा, शहरात इतरत्र पडलेल्या जुन्या गाड्या तातडीन उचलण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून कारवाई देखील करण्यात आली. महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपवर तक्रार केल्यानंतर एक तासाच्या आता प्रशासनाकडून कारवाई होत असल्याने गतिमान कारभाराचा अनुभवदेखील पुणेकरांनी घेतला.
केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या सदस्यांनी फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण शहरात विविध ठिकाणी फिरून स्वच्छ सर्वेक्षणची पाहणी केली. शहरात तीन ते चार दिवस मुक्काम करून समितीने शहरातील स्वच्छतागृहाची स्थिती कशी आहे, याची पाहणी केली.
 

Web Title: As soon as the central committee follows, the pile of debris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.