वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:27 PM2017-12-28T16:27:26+5:302017-12-28T16:31:45+5:30

उमेदीच्या काळात आणि तारुण्यामध्ये समाजसेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वार्धक्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ योजना सुरु केली आहे.

Social Welfare Assistance Fund of JanKalyan Committee for Veteran Workers: Shailendra Borkar | वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर

वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर

Next
ठळक मुद्देया अभिनव उपक्रमामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळणार मदतीचा हात पहिल्या टप्प्यामध्ये ५० संस्थांना पाठविण्यात येणार पत्रया कार्यकर्त्यांनी किमान बारा वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून केलेले असावे काम : शैलेंद्र बोरकर

पुणे : उमेदीच्या काळात आणि तारुण्यामध्ये समाजसेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वार्धक्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पैशांअभावी औषधोपचारांपासून दैनंदिन जगण्यातल्या अडचणी भेडसावत राहतात. अशा कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ योजना सुरु केली आहे. या कार्यकर्त्यांना सर्वप्रकारची मदत दिली जाणार असल्याची माहिती कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी दिली. 
समितीच्या या अभिनव उपक्रमामुळे विविध क्षेत्रांमध्ये निरपेक्ष वृत्तीने काम केलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मदतीचा हात मिळणार आहे. राज्यामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहेत. विविध सेवा कार्यांच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणेची चळवळ राबविण्यात येत आहे. समाजहिताच्या उद्देशाने आयुष्यातील महत्वाची वर्ष दिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना उतारवयामध्ये आर्थिक चणचण भासू लागते. अशा कार्यकर्त्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. जनकल्याण समितीला रा. स्व. संघाच्या एका स्वयंसेवकाने दोन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीमधून ही मदत केली जाणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले. 
व्यसनमुक्ती, सामाजिक सुधारणा, महिला सबलीकरण, मुस्लीम सत्यशोधक कार्य, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात काम केलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही योजना लाभदायी ठरु शकणार आहे. अनेक कार्यकर्त्यांना पैसे नसल्यामुळे दैनंदिन अडचणी भेडसावतात, अनेकांना आजारपणावर औषधोपचार करता येत नाही, शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत. याचा विचार करुन समितीने या योजनेची आखणी केली आहे. योजना राबविण्यासाठी राज्यभरातील विविध संस्थांना समितीमार्फत पत्र पाठविण्यात येणार आहेत. या संस्थांकडून अशा अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती मागविली जाणार आहे.
राष्ट्र सेवा दल, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, वेश्या वस्तीमध्ये करणाऱ्या संस्थांसह ८० संस्था निवडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ५० संस्थांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. यासोबतच वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमध्ये जाहीरात आणि निवेदनही देण्यात येणार आहे. संस्थांकडून प्राप्त झालेल्या नावांची पडताळणी केली जाणार आहे. या कार्यकर्त्यांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी प्रत्यक्ष भेट घेऊ न, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून पुर्ण खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे खऱ्या गरजू कार्यकर्त्याला लाभ मिळू शकणार आहे. निवडीचे निकष ठरविण्यात आलेले असून वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ दिला जाणार आहे. या कार्यकर्त्यांनी किमान बारा वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेले असावे असेही बोरकर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Social Welfare Assistance Fund of JanKalyan Committee for Veteran Workers: Shailendra Borkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.