तब्बल सहा हजारवेळा खणाणला पुणे अग्निशमन दलाचा फाेन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 07:46 PM2019-05-10T19:46:42+5:302019-05-10T19:47:36+5:30

गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे.

six thousand calls to pune fire brigade | तब्बल सहा हजारवेळा खणाणला पुणे अग्निशमन दलाचा फाेन

तब्बल सहा हजारवेळा खणाणला पुणे अग्निशमन दलाचा फाेन

googlenewsNext

- राहुल गायकवाड 
पुणे : गुरुवारी ऊरळी कांचन येथे साडीच्या दुकानाला लागलेल्या आगीत पाच कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे. 

पुणे शहर जसंजसं वाढत चाललं आहे, तसतसं आगीच्या घटनांमध्ये वाढ हाेत चालली आहे. गुरुवारी ऊरळी कांचन येथे लागलेल्या आगीत पाच कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेआधी देखील शहरात आगीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. 1 जानेवारी 2018 पासून 30 एप्रिल 2019 या कालावधीत विविध मदतीसाठी तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा अग्निशमन दलाला मदत मागण्यात आली आहे. यात सर्वाधिक 1785 घटना या घरामध्ये तसेच दुकानामध्ये लागलेल्या आगीच्या आहेत. 

घरातील गॅस व्यवस्थित बंद न करणे, इतर इलेक्ट्राॅनिक उपकरणांमुळे आग लागणे, तसेच घर, दुकानांमध्ये सुरक्षेची पुरेशी काळजी न घेणे यामुळे आग लागण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वरील कालावधीत इलेेक्ट्रिक शाॅर्टसर्किंटच्या 492 घटना घडल्या आहेत तर गॅसलिक हाेण्याच्या 144 घटना समाेर आल्या आहेत. कचऱ्याला आग लागण्याच्या 728 घटना या काळात घडल्या. याच काळात 556 प्राणी तसेच पक्षांना वाचवण्याचे काम अग्निशमन दलाने केले आहे. तर 118 घटना या बुडीत वर्दीच्या आहेत. या बराेबरच इतर गाेष्टींसाठी अग्निशमन दलाची मदत मागण्यात आली आहे. 
 

Web Title: six thousand calls to pune fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.