बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचे स्वागतच : सुशीलकुमार शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:28 PM2018-12-07T16:28:10+5:302018-12-07T16:39:30+5:30

वेगवेगळ्या प्रकारचे ‘मल्टिपर्पज कल्चरल सेंटर’ उभे राहत असल्यास त्याचे स्वागत करायला हवे...

Should be welcomed for demolishing Bal Gandharva auditourium, time needs: Sushilkumar Shinde | बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचे स्वागतच : सुशीलकुमार शिंदे 

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचे स्वागतच : सुशीलकुमार शिंदे 

Next
ठळक मुद्देसुवर्णमहोत्सव वर्ष पूर्ण केले असताना एका महिन्यात बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय नवीन बांधकाम करताना मुख्य सभागृहाची बांधणी योग्य व्हायला हवीमहापालिकेच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूदबालगंधर्व रंगमंदिराचे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त थिएटरमध्ये परिवर्तन होणे आवश्यक पक्ष जे सांगेल आणि ठरवेल तोच उमेदवार

पुणे : सध्याच्या काळात रंगमंदिरांकरिता पुरेशा प्रमाणात जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत महानगरपालिकेने बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे करत असताना त्यात वेळ न घालवता गायनाकरिता, नवोदित कलाकारांसाठी छोटी नाटयगृहे उभारणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ‘‘मल्टिपर्पज कल्चरल सेंटर’’ उभे राहत असल्यास त्याचे स्वागत करायला हवे. भविष्यात योग्य पध्दतीने त्याची अंमलबजावणी झाल्यास पुणेकर देखील या निर्णयाला स्वीकारतील. असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 


महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांची जन्मशताब्दी सुरु आहे. तसेच पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मुकूटमणी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने देखील सुवर्णमहोत्सव वर्ष पूर्ण केले असताना एका महिन्यात बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. त्यात भर म्हणजे पालिकेने त्याविषयीचे अधिकृत टेंडर देखील प्रसिध्द केले आहे. याबाबत शिंदे यांना विचारले त्यांनी पालिकेच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, अगदी सुरुवातीपासूनच बालगंधर्व नाट्यमंदिरात जातो. आता पलिकेने ते रंगमंदिर पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्लँनिंगबद्द्ल फारशी माहिती नाही. मात्र पालिका मुळचे रंगमंदिर पाडून त्याजागी सोयीसुविधांनी युक्त असे मल्टिपर्पज कल्चरल सेंटर उभारणार असेल तर त्याचे स्वागत करावे लागेल. मुख्य म्हणजे  त्यात रंगमंदिराच्या नावात काही बदल होणार नाही. नवीन बांधकाम करताना मुख्य सभागृहाची बांधणी योग्य व्हायला हवी. त्यात इतर छोटे नाट्यगृहे असणे गरजेचे आहे. याप्रमाणेच नवोदित कलाकारांना तालमीकरिता सभागृह बांधले गेल्यास त्याचा उपयोग होईल. अशा सर्व सुविधांनी युक्त असलेल्या नाट्यगृहाचे स्वागत पुणेकर करतील. असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. शहरातील सांस्कृतिक वैविध्य, शहराला प्राप्त झालेले आंतरराष्ट्रीय महत्व, सांस्कृतिक उपक्रमांची वाढ या सा-या बाबी लक्षात घेऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती करुन सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सर्व कलांना सामावून घेणारे अ‍ॅम्फीथिएटर, बालकलाकारांसाठी थिएटर, कार्यक्रमांची रंगीत तालीम असे वैविध्य निर्माण होणार आहे.
...............
 पार्टी ठरवेल तोच उमेदवार 
सोशल माध्यमांवर व्हायरल होणा-या छायाचित्रांमुळे आगामी निवडणूकांमध्ये पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर शिंदे यांनी मोठ्या सावधगिरीने उत्तर दिले. ते म्हणाले, शेवटी पक्ष आणि  ‘‘हायकमांड’’ जे ठरवेल त्याप्रमाणे उमेदवार उभा केला जाईल.त्यामुळे कुणीही निवडणूकीकरिता दावा करु शकत नाही. तेव्हा पक्ष जे सांगेल आणि ठरवेल तोच उमेदवार उभा राहिल. 
.....................
*पालिकेच्या अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, बालगंधर्व रंगमंदिराचे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त थिएटरमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. विविध आकारांची आणि वैशिष्ट्यांची सुसज्ज थिएटर्स, मुबलक पार्किंग, मनोरंजनाच्या सुविधा यांचा समावेश होऊन बालगंधर्व केवळ पुण्याचेच नव्हे, तर देशातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र होण्याच्या उद्देशाने पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Should be welcomed for demolishing Bal Gandharva auditourium, time needs: Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.