पुणे- शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज हे दारूच्या नशेत असायचे, असा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. संभाजी महाराज हा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता, अशी ओळ या पुस्तकात छापण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचं 'सर्व शिक्षा अभियानाचं' हे पुस्तक वादाच्या भोव-यात सापडलं आहे. त्यानंतर आता पुस्तकात छापलेल्या या मजकुराविषयी संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

नागपूरमधील लाखे प्रकाशन संस्थेनं पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. या पुस्तकातील पान नंबर 18वर संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. 'रायगडावरून संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता.

स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तीळतीळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले, असं या पुस्तकातून छापण्यात आलं आहे. संभाजी महाराज दारूच्या नशेत असलेल्या विधानावर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाला आहे.



Web Title: Shocking In the book of state government mentioned Sambhaji Maharaj's is 'drunker'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.