धक्कादायक ! ब्लड बॅंकेने दिली एक्स्पायरी डेट संपलेली रक्ताची पिशवी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:53 AM2018-10-20T09:53:31+5:302018-10-20T09:54:56+5:30

एक्स्पायरी डेट संपलेली रक्ताची पिशवी रुग्णाला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समाेर अाला अाहे. याप्रकरणी एफडीए पुढील चाैकशी करत अाहे.

Shocking Blood Bank gave expired blood bag to patient | धक्कादायक ! ब्लड बॅंकेने दिली एक्स्पायरी डेट संपलेली रक्ताची पिशवी

धक्कादायक ! ब्लड बॅंकेने दिली एक्स्पायरी डेट संपलेली रक्ताची पिशवी

googlenewsNext

पुणे : एक्स्पायरी डेट संपलेले रक्त एका रुग्णाला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला अाहे. मंगळवार पेठे येथील अाेम ब्लड बॅंकेने एका रग्णाला मुदत संपलेले रक्त दिले. डाॅक्टरांच्या लक्षात ही गाेष्ट अाल्याने पुढील अनर्थ टळला.ही घटना शुक्रवारी (19 अाॅक्टाेबर) घडली.  दरम्यान या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी अन्न व अाैषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) तक्रार केली असून एफडीएने याची दखल घेऊन तपासणी सुरु केली अाहे. 

 बारामती येथील याेगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डाॅक्टरांनी त्यांना तातडीने बी पाॅझिटिव्ह रक्ताची अावश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठ येथील अाेम ब्लड बॅंकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. रक्ताची पिशवी घेऊन ते रुग्णालयात अाले. डाॅक्टरांनी पिशवी वरील एक्स्पायरी डेट पाहिल्यावर त्यांनी रुग्णाला ते रक्त देण्यास नकार दिला. रक्ताच्या पिशवीवर 10 अाॅक्टाेबर 2018 ही एक्सपायरी डेट हाेती. ही गाेष्ट लक्षात येताच लासुरे यांनी तत्काळ अाेम ब्लड बॅंकेशी संपर्क साधला. यावेळी चुकीने रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याएेवजी या महिन्यातील 10 तारीख एक्स्पायरी डेट म्हणून टाकण्यात अाल्याचे सांगण्यात अाले. 

    घडलेल्या प्रकाराबाबत लासुरे यांनी एफडीए कडे तक्रार केली. या तक्रारीवरुन एफडीएने कारवाईला सुरुवात केली अाहे. तर दुसरीकडे क्लेरिकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा अाेम ब्लड बॅंकेकडून करण्यात येत अाहे. 

Web Title: Shocking Blood Bank gave expired blood bag to patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.