राज्य रयतेचे हा शिवरायांचा मूलमंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:39 AM2019-02-20T01:39:05+5:302019-02-20T01:39:28+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या महायोजना शिबिराचे उद््घाटन

This is Shivrajya's mantra, Chief Minister Devendra Fadnavis's rendering of state ryate | राज्य रयतेचे हा शिवरायांचा मूलमंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

राज्य रयतेचे हा शिवरायांचा मूलमंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Next

पुणे : शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांना राज्य रयतेचे आहे हा मूलमंत्र दिला. त्याचेच पालन केंद्र व राज्य सरकार करत आहे. वंचित, गरिबांना लाभ देणे हे सरकारचे काम आहे. त्यादृष्टीने समाजातील सर्व थरातील घटकांसाठी विविध योजना आणल्या, फक्त आणल्यात नाहीत तर त्या संबंधितांपर्यंत कशा पोहोचतील याची काळजी घेतली, असे मत व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच मंगळवारी फुंकले.

कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी महेश विद्यालय येथे आयोजित केलेल्या सरकारी योजनांची माहिती देणाºया महायोजना शिबिराचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

भौतिक विकासाकडेही सरकारचे लक्ष आहे, असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, १५ वर्षे पुण्यात ज्या योजनांची फक्त चर्चाच सुरू होती, त्या योजना आम्ही प्रत्यक्षात आणल्या, त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले, काम सुरू झाले. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर अशी योजना आहे. राज्यात २०२१ मध्येच ही योजना पूर्ण होईल, असे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यासाठी अनेक योजना दिल्या आहेत. पुणे हे उत्तम शहर आहेच, ते सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काही वर्षांतच पुण्याचा नवा चेहरा पाहायला मिळेल.
मुख्यमंत्र्यांना पुढील कार्यक्रमाची घाई असल्यामुळे अन्य कोणाचेही भाषण घेण्यात आले नाही. आमदार कुलकर्णी यांनी प्रास्तविकात शिबिराची माहिती दिली. लाभार्थी घटकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला. अनेक लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती; मात्र ते लगेच निघून गेल्यामुळे त्यांची निराशा झाली.

तक्रार करण्याचाही आम्हाला अधिकार नाही का?
च्राज्य राखीव दलातून अपात्र म्हणून कमी केलेल्या अपर्णा धारिया यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांचे कडे भेदून व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यामुळे त्या भयंकर संतप्त झाल्या होत्या. अन्याय निवारण व्हावे यासाठी तक्रार करण्याचाही आम्हाला अधिकार नाही का, अशी विचारणा करत त्यांनी माध्यमांसमोर गाºहाणे गायले.

४फडणवीस म्हणाले, सरकारी योजनांचा लाभ लवकर मिळत नाही असा समज होता. ज्यांच्यासाठी योजना आहेत, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतच नाही अशी स्थिती होती. आम्ही त्यात बदल केला. माहिती शिबिरे, समाधान शिबिरे आयोजित केली. हे शिबिर त्यापैकीच एक आहे.

Web Title: This is Shivrajya's mantra, Chief Minister Devendra Fadnavis's rendering of state ryate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.