दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:29 PM2018-09-15T16:29:00+5:302018-09-15T16:38:56+5:30

कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

Sharad Kalaskar's police custody extended till for September 17 | दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ 

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ 

googlenewsNext
ठळक मुद्देचारपैकी एक पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले असावे असा सीबीआयचा अंदाज एटीएसने अटक केली तेव्हा कळसकरकडून बंदूक आणि दुचाकी जप्त

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांना ओळखणारे दोघे जण आधीच पोहचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुलावर पोहचले. जेव्हा दाभोलकर पुलावर आले. तेव्हा शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हेच दाभोलकर आहेत का याबाबत तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री केली. ती होताच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या चार पिस्तुलांची तोडून ठाण्यातील कळवा , वसई आणि कल्याणमधील खाडी पूल यांपैकी नेमकी कुठे विल्हेवाट लावली याचा तपास करण्यासाठी कळसकरच्या पोलीस कोठडीत वाढ देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाने केली होती. न्यायालयाने ती मंजूर करत कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. 
 सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. वैभव राऊत आणि शरद कळसकर २३ जुलैला रात्री वैभव राऊतच्या घरुन निघाले. त्यांच्याकडे असलेल्या चार पिस्तुलांची त्यांना विल्हेवाट लावायची होती. ती पिस्तुलं त्यांनी तोडली आणि पिस्तुलाचे तूकडे एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात फेकून दिले. हे तुकडे ज्याठिकाणी फेकले ती जागा ठाण्यातील कळवा येतील पुल, वसईमधला खाडी पुल किंवा कल्याणमधील खाडी पुल यापैकी एक जागा होती. मात्र, रात्रीची वेळ असल्याने या तीनपैकी नक्की कोणत्या जागी पिस्तुलाचे तुकडे टाकण्यात आले हे शरद कळसकरला आत्ता आठवत नसल्याने त्याची आणखी चौकशी करण्यासाठी कोठडी वाढवून मागण्यात आलीय. या चारपैकी एक पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले असावे असा सीबीआयचा अंदाज आहे.
 बचाव पक्षाची बाजू मांडताना अ‍ॅड. धर्मराज चंडेल यांनी सांगितले, बारा दिवसांच्या कोठडीत कळसकर यांच्याकडून काहीच हस्तगत करण्यात आलेले नाही. हस्तगत करण्यासारखे काहीच सामान माझ्याकडे नसल्याचे यापूर्वीच कळसकर याने  सीबीआयला लेखी दिले होते. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्याकडे सीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येबाबत तपास करण्यात आलेला आहे तर दिगवेकर याला मारहाण झाली आहे. त्यामुळे कळसकर याच्या कोठडीचा देखील गैरवापर होऊ शकतो. कळसकर याला एटीएसने अटक केली तेव्हा त्याच्याकडून बंदूक आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हस्तगत करण्यासाठी वस्तू राहिलेली नाही. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, अशी मागणी त्याचे अ‍ॅड. चंडेल यांनी केली.

Web Title: Sharad Kalaskar's police custody extended till for September 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.