पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईतास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:36 PM2018-09-14T21:36:11+5:302018-09-14T21:37:42+5:30

तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अटक करण्यात बारामतीच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. हा आरोपी पोलीस असल्याची बतावणी करीत असे ..

Serious 45 cases accussed arrested by police | पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईतास अटक

पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईतास अटक

Next
ठळक मुद्देबारामती , नगर जिल्ह्यातील गंभीर गुन्हे उघडकीस

बारामती : तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अटक करण्यात बारामतीच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. हा आरोपी पोलीस असल्याची बतावणी करीत असे. त्यातून निर्जन ठिकाणी नेऊन लुट करण्याची त्याची पध्दत होती. त्याच्यावर बारामती येथील जबरी चोरीचे ३, नगर जिल्ह्यातील जबरी चोरीचे २ व जबरी चोरीसह लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अजिनाथ गायकवाड (वय ४६, रा. बेनवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे याप्रकरणातील अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. त्याने सहा गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्यावर कर्जत, हडपसर, बारामती, फलटण, इंदापूर, जामखेड, भूम, परांडा, माढा, कोतवाली पोलीस ठाण्यात नगर, पुणे याठिकाणी दुचाकी चोरीचे ४५ गुन्हे दाखल आहेत. दि. २६ मे २०१८ रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला बसमधून खाली उतरून घरी निघाली होती. यावेळी पाठीमागून एक दुचाकीवरील अज्ञात आरोपीने त्या महिलेला हाताने मारहाण करून ३० हजारांचे मनी मंगळसूत्र, ३० सोन्याचे मनी, दोन पायातील पैंजण असा एकुण ४६ हजार ५०० रूपये किमंतीचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. 
बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात दि. २६ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी बारा ते सव्वा एकच्या सुमारास सुर्यनगरी येथील पाटील प्लाझा पोलीस असल्याची बतावणी करीत मारहाण करून मोबाईल व रोकड असा एकूण ७ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला होता. तर तिसऱ्या गुन्ह्यात एका महिलेला बारामती ब स्थानकाजवळ  ‘तुम्ही गुन्हा केला आहे, तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे, असे सांगून माळावरची देवी येथे नेत मोबाईल व दागिने असा २३ हजार ३६० रूपयांचा ऐवज हिसकावण्यात आला होता. 
अशाप्रकारचे गुन्हे या आरोपीने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देखील केले आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक चंद्रशेखर यादव व पथकाने रेकॉर्डवरील ८० आरोपी तपासले. गुन्हा घडल्यानंतर वेळोवेळी नाकाबंदी करण्यात आली होती. गुन्ह्यातील आरोपींनी ज्या मार्गाचा वापर केला आहे, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची छबी कैद झाली होती. त्याचे नाव निष्पन्न करणे अवघड होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा पेहराव व तांत्रिक माहिती वरून विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेतला.
नुकतेच (दि ११) सप्टेंबर रोजी गायकवाडला ताब्यात घेऊन गजाआड केले. ही कारवाई अतिरीक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक चंद्रशेखर यावद, पोलीस हवालदार दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, पोलीस नाईक संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, रॉकी देवकाते यांनी केली. 

Web Title: Serious 45 cases accussed arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.