वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : किर्तने, डॉ. घाटे, वसंत, शहा यांना दुहेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:31 AM2019-02-08T01:31:32+5:302019-02-08T01:31:46+5:30

नितीन किर्तने व डॉ. माधव घाटे आणि मुंबईचे मयूर वसंत, अहमदाबादच्या योगेश शहा यांनी एकेरी आणि दुहेरी गटामध्ये विजेतेपद जिंकून सोलारिस जीआयएसटीए वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केले.

Senior National Tennis Tournament: Kirtane, Dr. Dual crowns for deficit, spring and Shah | वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : किर्तने, डॉ. घाटे, वसंत, शहा यांना दुहेरी मुकुट

वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : किर्तने, डॉ. घाटे, वसंत, शहा यांना दुहेरी मुकुट

Next

पुणे - नितीन किर्तने व डॉ. माधव घाटे आणि मुंबईचे मयूर वसंत, अहमदाबादच्या योगेश शहा यांनी एकेरी आणि दुहेरी गटामध्ये विजेतेपद जिंकून सोलारिस जीआयएसटीए वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केले.

सोलारिस क्लबच्या वतीने मयूर कॉलनी येथील त्यांच्या टेनिस कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेतील ४५ वर्षांवरील गटामध्ये डेव्हिस कप खेळाडू नितीन किर्तने यांनी अजय कामत यांचा ६-०, ६-१ गुणांनी सहज पराभव करून विजेतेपद मिळविले. या गटात दुहेरीमध्ये नितीनने अजय कामतच्या साथीमध्ये खेळताना सुनील लुल्ला आणि अजित सैल या जोडीचा ६-२, ६-३ असा सहज पराभव करून एकेरी आणि दुहेरीत विजेतेपद मिळविताना दुहेरी मुकुट पटकावला.

५५ वर्षांवरील गटामध्ये मुंबईच्या मयूर वसंत यांनी पुण्याच्या जयंत पवार यांचा ६-०, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळविले. दुहेरीच्या गटात मयूरने मेहेर प्रकाशच्या साथीत जयंत पवार व संजय कामत ६-१, ६-० असा सहज पराभव करून विजेतेपद मिळविले.
६० वर्षांवरील गटात अहमदाबादच्या योगेश शहा यांनी पुण्याच्या रवींद्र नगरकर यांचा ६-१, ६-२ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. योगेशने अजय लखोटीयाच्या साथीत एम. सुरेश व एम. फर्नांडिस या जोडीचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळविले.
६५ वर्षांवरील गटात पुण्याच्या डॉ. माधव घाटे यांनी मुंबईच्या डी. एस. रामाराव यांचा ६-३, ६-२ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. दुहेरीमध्ये डॉ.माधव घाटे याने व्हीएलएसएन राजू यांच्या साथीत धवल पटेल व इ.किणीकर या जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. ३५ वर्षांवरील गटामध्ये पुण्याच्या रवींद्र पांड्ये याने पुण्यातील मंदार वाकणकर याचा ४-६, ६-४, १०-७ असा सुपर टायबे्रकमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. ७० वर्षांवरील गटात पुण्याच्या प्रवीण महाजन यांनी पुण्याच्या शाम गायकवाड यांचा ७-५, २-६, १०-७ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बॅडमिंटनपटून निखिल कानिटकर आणि सोलारिसचे जयंत पवार, क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते झाले. विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

अंतिम फेरीचा निकाल:

३५ वर्षांवरील गट: रवींद्र पांड्ये (पुणे) वि.वि. मंदार वाकणकर (पुणे) ४-६, ६-४, १०-७; ४५ वर्षांवरील गट: नितीन किर्तने (पुणे) वि.वि. अजय कामत (पुणे) ६-०, ६-१; ५५ वर्षांवरील गट: मयूर वसंत (मुंबई) वि.वि. जयंत पवार (पुणे) ६-०, ६-०; ६० वर्षांवरील गट: योगेश शहा (अहमदाबाद) वि.वि. रवींद्र नगरकर ६-१, ६-२; ६५ वर्षांवरील गट: डॉ. माधव घाटे (पुणे) वि.वि. डी.एस. रामाराव (मुंबई) ६-३, ६-२; ७० वर्षांवरील गट: प्रवीण महाजन (पुणे) वि.वि. शाम गायकवाड (पुणे) ७-५, २-६, १०-७; दुहेरी: ३५ वर्षांवरील गट: मंदार वाकणकर/संग्राम चाफेकर वि.वि. अमित किंडो/मनोज कुशालकर ६-२, ६-४; ४५ वर्षांवरील गट: अजय कामत/नितीन किर्तने वि.वि. सुनील लुल्ला/अजित सैल ६-२, ६-३; ५५ वर्षांवरील गट: मयूर वसंत/मेहेर प्रकाश वि.वि. जयंत पवार/संजय कामत ६-१, ६-०; ६० वर्षांवरील गट: योगेश शहा/अजय लखोटीया वि.वि. एम. सुरेश/एम. फर्नांडिस ६-२, ६-२; ६५ वर्षांवरील गट: डॉ.माधव घाटे/व्हीएलएसएन राजू वि.वि. धवल पटेल/इ.किणीकर ६-३, ६-४; ७० वर्षांवरील गट: प्रवीण महाजन/शाम गायकवाड वि.वि. डी. डिसुझा/बाबा रॉड्रीक्स ६-१, ६-०.

Web Title: Senior National Tennis Tournament: Kirtane, Dr. Dual crowns for deficit, spring and Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.