पुण्यात भरधाव स्कूल बसने महिलेला चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 05:02 PM2019-01-23T17:02:18+5:302019-01-23T17:02:53+5:30

भरधाव वेगाने आलेल्या स्कुल बसने ससून चौकात महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे.यात संबंधित महिलेचा जागेवर मृत्यू झाला आहे

A school bus rushing in Pune collapsed in Pune | पुण्यात भरधाव स्कूल बसने महिलेला चिरडले

पुण्यात भरधाव स्कूल बसने महिलेला चिरडले

Next

पुणे  - भरधाव वेगाने आलेल्या स्कुल बसने ससून चौकात महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे.यात संबंधित महिलेचा जागेवर मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुरेखा सुभाष निकाळजे (वय 45) या ससून चौकात रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी त्यांना समोरून येणाऱ्या एनडीएच्या (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) भरधाव बसने चिरडले.ही धडक ही भयंकर होती की निकाळजे यांच्या अंगावर बसचे पुढचे चाक गेले. याच चौकात बंडगार्डन पोलीस स्टेशन असल्यामुळे लगेचचं त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. याचं चौकात जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालये असल्यामुळे हा भाग कायम गजबजलेला असतो. भरदिवसा  हा अपघात झाल्यामुळे अनेकांनी रस्ता ओलांडण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले.

Web Title: A school bus rushing in Pune collapsed in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.